Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 12:53 IST2025-07-13T12:50:04+5:302025-07-13T12:53:16+5:30

Amazon Prime Day Sale: अ‍ॅमेझॉनवर प्राइम डे सेल सुरू असून ग्राहकांना सॅमसंगचा एस २४ अल्ट्रा फोन अगदी कवडीच्या भावात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

Amazon Prime Day Sale massive Discount on Samsung S24 Ultra | Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!

Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!

अ‍ॅमेझॉनवर प्राइम डे सेल सुरू असून ग्राहकांना सॅमसंगचा एस २४ अल्ट्रा फोन अगदी कवडीच्या भावात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सॅमसंगचा एस २४ अल्ट्राची (१२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज) किंमत एक लाख ३५ हजार रुपये आहे. मात्र, या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना थेट ६० हजार रुपयांची सूट दिली जात आहे.

अ‍ॅमेझॉनवर सॅमसंग एस २४ अल्ट्रा ७५ हजारांत उपलब्ध आहे. याशिवाय, फोनवर बँक कार्ड डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर आणि कॅशबॅक यासाठीही वेगळी ऑफर दिली जात आहे. या सर्व ऑफर्सचा लाभ घेतल्यास हा फोन तुम्हाला ५० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळू शकतो.

सॅमसंग एस २४ अल्ट्रा: फीचर्स
सॅमसंग एस २४ अल्ट्रामध्ये २०० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये १२ मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो. फोनमध्ये ५००० एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी ४५ वॅट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनमध्ये ६.८ इंचाचा फ्लॅट डिस्प्ले मिळतो. फोनमध्ये ग्राहकांना १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी ते १ टीबी स्टोरेजपर्यंत पर्याय उपलब्ध आहे.

खरेदी करावा की नाही?
तज्ज्ञांच्या मते, सॅमसंगचा हा प्रीमियम फोन प्रत्येक बाबतीत सर्वोत्तम म्हणता येईल. यामध्ये तुम्हाला एक उत्तम प्रोसेसर आणि एक उत्तम कॅमेरा सेटअप मिळतो. फोनमध्ये दिलेला गॅलेक्सी एआय प्रत्येक वापरकर्त्याला आवडेल. फोनमध्ये रिअल टाइम ऑन कॉल ट्रान्सलेशनची एक उत्तम सुविधा देखील आहे. हा फोन तुमच्या बजेटमध्ये असेल तर तुम्ही हा फोन न डगमगता ऑर्डर करू शकतात.

Web Title: Amazon Prime Day Sale massive Discount on Samsung S24 Ultra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.