लस घ्या आणि 3.70 कोटी रुपयांचं बक्षीस मिळवा; अॅमेझॉनने कर्मचाऱ्यांसाठी केली मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 16:13 IST2021-08-09T16:11:52+5:302021-08-09T16:13:03+5:30
Amazon Vaccination Lottery: कंपनीने लस घेणाऱ्या आपल्या अमेरिकेतील कर्मचाऱ्यांसाठी 5,00,000 डॉलर्सच्या बक्षिसाची घोषणा केली आहे.

सौजन्य: REUTERS/Brendan McDermid
गेल्यावर्षी पासून जगावर आलेले संकट म्हणजे कोरोना आणि यावर मात करण्याचा मार्ग म्हणजे लसीकरण. या लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या केल्या जात आहेत. या यादीत ई-कॉमर्स दिग्गज अॅमेझॉनचा देखील समावेश झाला आहे. कंपनीने लस घेणाऱ्या आपल्या अमेरिकेतील कर्मचाऱ्यांसाठी 5,00,000 डॉलर्सच्या बक्षिसाची घोषणा केली आहे.
अॅमेझॉनने आपल्या 13 लाख कर्मचाऱ्यांसाठी ‘मॅक्स युअर वॅक्स’ नावाच्या कॉर्पोरेट लॉटरीची घोषणा केली आहे, अशी माहिती ब्लूमबर्गच्या रिपोर्ट मधून समोर आली आहे. या लॉटरी अंतर्गत अॅमेझॉन एकूण 2 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या (सुमारे 14 कोटी 86 लाख रुपये) बक्षिसांची घोषणा केली आहे. यात दोन 5,00,000 डॉलर (सुमारे 3.70 कोटी रुपये) कॅश प्राईज, सहा 1,00,000 डॉलर (सुमारे 70 लाख रुपये) च्या भेटवस्तू, पाच नवीन वाहने आणि पाच व्हॅकेशन पॅकेजेस अश्या एकूण 18 बक्षिसांचा समावेश करण्यात आहे.
व्हॉट्सअॅपवरून करा कोरोना लस प्रमाणपत्र डाउनलोड
लस घेतल्यावर तुम्ही CoWin वेबसाईटवरून किंवा आरोग्य सेतू अॅपमधून तुम्ही प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता. परंतु आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपवरून लस प्रमाणपत्र कसं डाउनलोड करायचं हे सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला +91 9013151515 या MyGov कोरोना हेल्पडेस्कचा व्हॉट्सअॅप नंबरवर ‘Download Certificate’ असा मेसेज टाईप करून पाठवावा लागेल. त्यानंतर आलेला OTP चॅट बॉक्समध्ये टाईप करून पाठवल्यावर तुम्हाला लस प्रमाणपत्र डाउनलोड करता येईल.