आजपासून अॅमेझॉनचा 'फॅब फोन फेस्ट', 'या' स्मार्टफोन्सवर बंपर सूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 13:57 IST2019-06-10T13:56:16+5:302019-06-10T13:57:41+5:30
'फॅब फोन फेस्ट' सेलमध्ये अॅपल, ऑनर, ओपो आणि वीवो कंपनीच्या स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे.

आजपासून अॅमेझॉनचा 'फॅब फोन फेस्ट', 'या' स्मार्टफोन्सवर बंपर सूट
नवी दिल्ली : ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनने स्मार्टफोन्स खरेदी करणाऱ्यांसाठी खास सेल आणला आहे. आजपासून अॅमेझॉनने 'फॅब फोन फेस्ट' हा सेल आणला असून यामाध्यमातून स्मार्टफोन्सवर अनेक ऑफर्स आणल्या आहेत.
'फॅब फोन फेस्ट' सेलमध्ये वनप्लस 6 टी सारखा स्मार्टफोन 27,99 रुपयांना मिळत आहे. याशिवाय स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांना रेडमी वाय 3, रेडमी 7, सॅमसंग एम 20 आणि सॅमसंग एम 30 असे स्मार्टफोन्स सुद्धा ओपन सेलमध्ये मिळणार आहेत. आतापर्यंत असे स्मार्टफोन्स फ्लॅश सेलमध्येच ग्राहकांना मिळत होते.
दरम्यान, 'फॅब फोन फेस्ट' सेलमध्ये अॅपल, ऑनर, ओपो आणि वीवो कंपनीच्या स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे.
वनप्लस 6 टी
या सेलमध्ये वनप्लस 6टी स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मेमरी आहे. या स्मार्टफोवर 14,000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. म्हणजेच 41,999 रुपये किंमत असलेला हा स्मार्टफोन ग्राहकांना 27,999 रुपयांना मिळू शकतो.
शाओमी एमआय ए 2
गेल्यावर्षी लाँच झालेल्या शाओमी एमआय ए 2 या फोनवर 6500 रुपयांचा डिस्काउंट देण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना आता हा स्मार्टफोन सेलमध्ये 10,999 रूपयांना खरेदी करता येईल. लाँचिगवेळी हा स्मार्टफोनची किंमत 17,499 रुपये होती.
आयफोन एक्सआर
अॅपलचा नुकताच लाँच झालेला एक्सआर हा स्मार्टफोन सुद्धा सेलमध्ये उपलब्ध आहे. एक्सआरचे 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटचा मोबाईल 59,999 तर 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटचा मोबाईल 64,999 रूपयांना मिळणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एम 30
सॅमसंगच्या एम सीरीजमधील हा लोकप्रिय मोबाईल 'एम 30' हा 1,500 रूपयांच्या डिस्काउंटसह 14,990 रूपयांना मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि64 जीबी स्टोरेज मेमरी असणार आहे.
रेडमी 6 ए
या सेलमध्ये 2 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज मेमरी असलेला रेडमी 6 ए स्मार्टफोन 5,999 रूपयांना मिळणार आहे. तर 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज मेमरी असलेला रेडमी 6 ए स्मार्टफोन 6,499 रुपयांना मिळणार आहे.