स्मार्टफोन, लॅपटॉप आणि होम अप्लायन्सवर देखील मिळणार भरघोस सूट; Amazon च्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल’ ची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 17:24 IST2021-09-20T17:24:34+5:302021-09-20T17:24:54+5:30
Amazon Great Indian Festival Sale Offers: Amazon India ने आपल्या आगामी Great Indian Festival Sale ची घोषणा केली आहे.

स्मार्टफोन, लॅपटॉप आणि होम अप्लायन्सवर देखील मिळणार भरघोस सूट; Amazon च्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल’ ची घोषणा
Amazon India ने आपल्या आगामी फेस्टिव्ह सीजन सेलची घोषणा केली आहे. कंपनीच्या आगामी Great Indian Festival Sale ची माहिती एका मायक्रोसाईटच्या माध्यमातून समोर आली आहे. या पेजवर कंपनीने आपल्या आगामी सेलमधील बँक ऑफर्स आणि डील्सची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे नुकतीच फ्लिपकार्टने आपल्या Flipkart Big Bilion Days Sale ची घोषणा केली होती.
दरवर्षी ई-कॉमर्स वेबसाईट नवरात्री, दिवाळी दरम्यान फेस्टिव्ह सीजन सेलचे आयोजन करतात. यावर्षी देखील फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनने आपल्या फेस्टिव्ह सेलची घोषणा केली आहे. यावर्षी देखील इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स, फॅशन अॅक्सेसरीज, घरगुती उपकरणे इत्यादींवर या सेलमध्ये भरघोस सूट देण्यात येईल.
Amazon Great Indian Festival Sale
अॅमेझॉनवर आयोजित आगामी सेलमध्ये HDFC बँक कार्डने खरेदी केल्यास 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, अॅक्सेसरीज, कम्प्युटरसह अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर ही ऑफर दिली जाणार आहे. HDFC बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट दोन्हींवर ही ऑफर लागू होईल. तसेच Amazon Prime मेंबर्सना या सेलचा फायदा 24 तास आधीच घेता येईल.
ICICI बँकेच्या कार्डचा वापर करून खरेदी केल्यास 5 टक्के रिवॉर्ड पॉईंट्स मिळतील. तसेच या सेलमध्ये प्रोडक्ट्स विकत घेतल्यास 25,000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफर देखील मिळतील. अॅमेझॉन कुपन्सच्या माध्यमातून 20 लाखांपेक्षा जास्त प्रोडक्ट्सवर डिस्काउंट मिळेल. मोबाईल आणि अॅक्सेसरीज खरेदी केल्यास कॅशबॅक, एक्सचेंज ऑफर, नो-कॉस्ट EMI आणि फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट सारख्या ऑफर्सचा लाभ देखील घेता येईल.