शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

अल्काटेलचा टू इन वन टॅबलेट

By शेखर पाटील | Published: March 23, 2018 3:09 PM

अल्काटेलने आपल्या पॉप १० ४जी या आधी सादर केलेल्या टॅबलेटला आता टु-इन-वन या पर्यायात सादर केले असून याचे मूल्य १२,९९९ रुपये आहे.

अल्काटेलने आपल्या पॉप १० ४जी या आधी सादर केलेल्या टॅबलेटला आता टु-इन-वन या पर्यायात सादर केले असून याचे मूल्य १२,९९९ रुपये आहे. अल्काटेल कंपनीने गेल्या महिन्यात पॉप १० ४जी हा टॅबलेट भारतीय बाजारपेठेत १०,९९९ रुपये मूल्यात लाँच केला होता. आता याला नवीन स्वरूपात सादर करण्यात आले आहे. याच्या सोबत संलग्न करण्यास सक्षम असणारा की-बोर्डदेखील देण्यात आला आहे. यामुळे हे मॉडेल लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही स्वरूपात वापरता येणार आहे. ब्ल्यु-टूथच्या मदतीने हा कि-बोर्ड टॅबलेटला कनेक्ट करता येतो. तसेच ओटीजी कनेक्टरच्या माध्यमातून माऊसदेखील वापरण्याची सुविधा यात देण्यात आलेली आहे. याचे मूल्य १२,९९९ रूपये असून ग्राहकांना हे मॉडेल फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टलवरून खरेदी करता येईल. या मॉडेलमध्ये १०.१ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजेच १२८० बाय ८०० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात मीडियाटेकचा क्वॉड-कोअर एमटी८१२७ प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. हा टॅबलेट ८ व ५ मेगापिक्सल्सच्या अनुक्रमे मुख्य व फ्रंट कॅमेर्‍यांनी सज्ज आहेत. यातील बॅटरी ५८३० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. अल्काटेल पॉप ४ १० या मॉडेलमध्ये वाय-फाय, जीपीएस/ए-जीपीएस, ब्ल्यु-टुथ, वाय-फाय डायरेक्ट, हेडफोन जॅक आदी फिचर्स दिलेले आहेत. विशेष म्हणजे यात कुणीही फोर-जी नेटवर्कचा सपोर्ट असणारे सीमकार्ड टाकून व्हाईस कॉलींगसह इंटरनेटचा वापर करू शकतो. 

टॅग्स :laptopलॅपटॉप