Airtel Recharge Plan : एअरटेल नवीन प्रीपेड प्लॅनमध्ये वर्षभर मिळेल अनिलमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 11:56 AM2023-04-13T11:56:03+5:302023-04-13T11:56:32+5:30

Airtel Recharge Plan : टेलिकॉम कंपनी एअरटेल आपला विस्तार वेगाने करत आहे.

airtel recharge plan for 365 days unlimited calling and data | Airtel Recharge Plan : एअरटेल नवीन प्रीपेड प्लॅनमध्ये वर्षभर मिळेल अनिलमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट डेटा

Airtel Recharge Plan : एअरटेल नवीन प्रीपेड प्लॅनमध्ये वर्षभर मिळेल अनिलमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट डेटा

googlenewsNext

नवी दिल्ली : जर तुम्हाला वाटत असेल की सतत फोन रिचार्ज करावा लागू नये. फक्त एकदाच रिचार्ज केल्यानंतर अनेक दिवस काम सुरू राहावे. तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण आम्ही तुम्हाला एअरटेलच्या अशाच एका प्लॅनबद्दल सांगत आहोत. ज्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, अनलिमिटेड डेटासह अनेक बेनिफिट्स मिळतात. दरम्यान, टेलिकॉम कंपनी एअरटेल आपला विस्तार वेगाने करत आहे. तसेच, ५ जी टेक्नॉलॉजीची सुरुवात लोकांद्वारे आपल्या मोबाईल डिव्हाइसचा वापर करण्याच्या पद्धतीत बदल करण्याच्या तयारीत आहे. 

१९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
१९९ रुपयांचा एअरटेल प्रीपेड रिचार्ज प्लॅन अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि ३ जीबी डेटा मिळतो आहे. यामध्ये तुम्हाला ३०० एसएमएस सुद्धा मिळतात. ज्यात दररोज १०० एसएमएस पाठवले जाऊ शकतात. दरम्यान, एकदा डेटा लिमिट संपल्यानंतर ग्राहकांकडून प्रत्येक एमबीवर ५० पैसे चार्ज घेतले जाईल. प्लॅनमध्ये Wynk Music साठी मोफत सब्सक्रिप्शन सुद्धा मिळते. 

२९६ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
बेनिफिट्समध्ये अनलिमिटेड कॉल्स, २५ जीबी डेटा, १०० एसएमएस/दररोज, प्राइम व्हिडिओ मोबाईल कॉपी फ्री ट्रायल, Wynk म्युझिक सब्सक्रिप्शन, फ्री हॅलो ट्यून्स, FASTag वर १०० रुपयांचा कॅशबॅक आणि ३ महिनांसाठी अपोलो सब्सक्रिप्शनचा समावेश आहे. २९६ रुपयांच्या एअरटेल रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी ३० दिवसांची आहे.

४५५ रुपायंचा रिचार्ज प्लॅन
जर तुम्ही डेटापेक्षा जास्त व्हॉइस कॉल करण्यास प्राधान्य देत असाल, तर एअरटेलचा हा प्रीपेड रिचार्ज प्लान तुमच्यासाठी आहे. ४५५ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ८४ दिवसांसाठी ६ जीबी डेटा मिळतो. देशभरातील प्रत्येक नेटवर्कवर कॉल करणे सर्वांसाठी विनामूल्य असेल आणि तुम्ही दररोज १०० एसएमएस मिळवू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. याशिवाय मोफत हॅलो ट्यून आणि Wynk Music चे सदस्यत्वही मिळते.

३३५९ रुपयांचा  Disney + Hotstar रिचार्ज प्लॅन
एअरटेलचा ३३५९ रुपयांचा नवीन फ्लॅगशिप रिचार्ज प्लॅन ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. हा प्लॅन तुम्हाला दररोज 2GB डेटा ऑफर करतो. अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस देखील उपलब्ध आहेत. OTT बेनिफिट्स व्यतिरिक्त, हा प्लॅन एका वर्षासाठी Disney + Hotstar मोबाइल सपोर्टसह येतो. याशिवाय Apollo 24/7 सर्कल, Fastag वर १०० रुपये कॅशबॅक, मोफत Hello Tunes आणि WYNK म्युझिक देखील या एअरटेल रिचार्ज प्लॅन २०२३ मध्ये उपलब्ध आहेत.

Web Title: airtel recharge plan for 365 days unlimited calling and data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.