शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Airtel-Jioचं टेन्शन वाढणार; आता Elon Musk यांची सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिस भारतात एन्ट्री करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 18:55 IST

आता, इलॉन मस्क सर्व सरकारी मंत्रालयांची मंजूरी घेतल्यानंतर, स्टारलिंक सर्व्हिस लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.

इलॉन मस्क यांच्या, सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिस पुरवणाऱ्या स्टारलिंक कंपनीचा भारतात एन्ट्री करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यामुळे ही कंपनी आता लवकरच भारतात एंट्री करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी परवान्याशिवाय सेवा सुरू केल्याबद्दल या कंपनीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता, इलॉन मस्क सर्व सरकारी मंत्रालयांची मंजूरी घेतल्यानंतर, स्टारलिंक सर्व्हिस लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.

स्टारलिंक सर्व्हिस लॉन्च झाल्यानंतर, जिओ आणि एअरटेलच्या अडचणीत वाढ होऊ शकते. कारण आता एअरटेल आणि जिओ दोघेही सॅटेलाइट इंटरनेटच्या रेसमध्ये सामील झाले आहेत. एअरटेल वन वेबसोबत सॅटेलाइट सर्व्हिस लॉन्च करत आहे. तर जिओनेही लक्झेंबर्गची कंपनी SES सोबत सॅटेलाइट सर्व्हिससाठी भागीदारी केली आहे.

किती मिळेल स्पीड - स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिसची टॉप स्पीड 1.5 ते 2Gbps एवढी असल्याचा दावा केला जात आहे. नावाप्रमाणेच ही एक सॅटेलाइट सर्व्हिस आहे. यामुळे हिला मोबाइल टॉवरची  आवश्यकता लागणार नाही. यामुळे देशातील दूर्गम भागांमध्येही  सहजपणे इंटरनेट सेवा पोहोचण्यास मदत मिळेल. स्टारलिंक सध्या 40 हून अधिक देशांत सर्व्हिस देत आहे. इलॉन मस्क यांच्या स्टारलिंग सर्व्हिसमध्ये वाय-फाय राउटर, पॉवर सप्लाय, केबल आणि एक माउंटिंग ट्रायपॉड दिला जातो. हे राउटर सॅटेलाइटा कनेक्टेड असते.

...म्हणून स्टारलिंकवर घालण्यात आली होती बंदी -स्टारलिंकने 2021 मध्ये लायसन्स न घेतात आपली सर्व्हिस सुरू केली होती. याच बरोबर, त्यांनी ग्राहकांकडून सर्व्हिस सुरू होण्यापूर्वीच प्री-ऑर्डर म्हणून सिक्योरिटीच्या स्वरुपात पैसेही जमा केले होते. मात्र भारत सरकारकडून मंजुरी न मिळाल्याने इलॉन मस्क यांना आपला प्रोजेक्ट बंद करावा लागला होता. तसेच भारतीय ग्राहकांचे पैसेही परत करावे लागले होते.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कJioजिओAirtelएअरटेलInternetइंटरनेट