शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 14:24 IST

दूरसंचार क्षेत्रातील मोठी कंपनी भारती एअरटेलने पुन्हा एकदा ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमधील ₹१२१ आणि ₹१८१ ...

दूरसंचार क्षेत्रातील मोठी कंपनी भारती एअरटेलने पुन्हा एकदा ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमधील ₹१२१ आणि ₹१८१ किमतीचे दोन महत्त्वाचे प्रीपेड डेटा पॅक गुपचूप बंद केले आहेत. हे दोन्ही पॅक ३० दिवसांच्या वैधतेसह येत असल्याने, ग्राहकांमध्ये या प्लॅनना जास्त पसंती होती.

  • ₹१२१ चा डेटा पॅक: यात ग्राहकांना एकूण ८GB (६GB बेस डेटा + एअरटेल थँक्स ॲपवर २GB बोनस) डेटा मिळत होता. 
  • ₹१८१ चा डेटा पॅक: यात १५GB डेटासह एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियम (Airtel Xstream Play Premium) सारख्या OTT सेवांचे बंडलिंग फायदे मिळत होते.कंपनीच्या या निर्णयामुळे, ज्या ग्राहकांना केवळ डेटा टॉप-अपसाठी ३० दिवसांच्या वैधतेचा स्वस्त पर्याय हवा होता, त्यांची मोठी गैरसोय होणार आहे. याऐवजी आता ग्राहकांना जास्त किमतीच्या किंवा कमी वैधतेच्या डेटा पॅकची निवड करावी लागणार आहे.

दरवाढीचे स्पष्ट संकेत२०२५ मधील टॅरिफ दरवाढीच्या धोरणाअंतर्गत एअरटेलने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. कंपनी सातत्याने आपल्या कमी किमतीच्या योजना पोर्टफोलिओमधून काढून टाकत आहे. यापूर्वी कंपनीने ₹१९९ च्या खालील एंट्री-लेव्हल प्लॅनही महाग केले होते. यामागचा मुख्य उद्देश 'सरासरी महसूल प्रति ग्राहक' वाढवणे हा आहे.

सध्या स्वस्त डेटा पॅक काढून टाकून एअरटेल ग्राहकांना उच्च किमतीच्या आणि जास्त डेटा वापर असलेल्या प्लॅन्सकडे वळण्यास प्रवृत्त करत आहे. दूरसंचार कंपन्यांसाठी एआरपीयू (ARPU) वाढवणे हे महत्त्वपूर्ण असल्याने, भविष्यात मोबाइल रिचार्जचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Airtel discontinues affordable 30-day plans, forcing users to pay more.

Web Summary : Airtel silently removed ₹121 and ₹181 data packs, popular for 30-day validity. Customers now face higher costs for data top-ups. This move signals tariff hikes, pushing users to pricier plans to boost Airtel's ARPU.
टॅग्स :Airtelएअरटेल