Airtel 5G: कधी होणार लॉन्च आणि किती असेल Airtel 5G प्लॅन्सची किंमत? महत्वाची माहिती आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 16:10 IST2022-03-27T16:10:26+5:302022-03-27T16:10:39+5:30
Airtel 5G: भारतात 5G सेवा लॉन्च करण्यासाठी एअरटेलने आपली तयारी पूर्ण केली आहे.

Airtel 5G: कधी होणार लॉन्च आणि किती असेल Airtel 5G प्लॅन्सची किंमत? महत्वाची माहिती आली समोर
भारतातील नागरिकांना 5G साठी जास्त वाट पाहावी लागणार नाही. देशात लवकरच 5G सेवा सुरू होऊ शकते. देशातील दूरसंचार कंपनी एअरटेल(Airtel)ने दिलेल्या माहितीनुसार, 5G स्पेक्ट्रम लिलाव पूर्ण झाल्यानंतर 5G सेवा सुरू होतील. 91Mobiles च्या वृत्तानुसार, कंपनीचे मुख्य तांत्रिक अधिकारी रणदीप सेखॉन यांनी गुरुवारी एका कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली.
5G सेवा कधी सुरू होईल
रणदीप सेखॉन म्हणाले की, कंपनी 5G स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर 2 ते 3 महिन्यांत 5G सेवा सुरू करेल. गुरुवारी झालेल्या 5G नेटवर्क डेमो दरम्यान ही माहिती दिली आहे. या कार्यक्रमात Airtel ने 5G ची झलक दाखवली. कंपनीने 5G वर व्हिडिओ अनुभव शेअर केला. हा डेमो सरकारने टेलिकॉम कंपन्यांना चाचणीसाठी दिलेल्या 3500MHz च्या बँडवर करण्यात आला होता.
Airtel 5G ची किंमत किती असेल
सेखॉन यांनी सांगितल्यानुसार, स्पेक्ट्रम लिलाव पूर्ण झाल्यानंतर एअरटेल 5G लाँच करण्यासाठी पूर्णपणे तयार असेल. एअरटेल 5G च्या किमतीबाबत बोलताना ते म्हणाले की, भारतातील 5G प्लॅनची किंमत 4G प्लॅन्स सारखीच असेल. एअरटेलने गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या 5G नेटवर्क स्पीडचा डेमोही दाखवला.
एअरटेलच्या 5जीचा स्पीड किती
कंपनीने 1983 च्या विश्वचषकात कपिल देव यांच्या खेळीचा व्हिडिओ प्ले केला होता. एअरटेलने 50 कॉनकरंट युझर्ससोबत 4K व्हिडिओ प्ले केला, ज्यामध्ये युझर्सना 200mbps ची स्पीड मिळत होती. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये एअरटेलने हैदराबादमध्ये 5G नेटवर्कचा डेमो दाखवला होता. कंपनीने जूनमध्ये गुरुग्राममध्ये 5G नेटवर्कची चाचणी घेतली होती, ज्यामध्ये 1Gbps स्पीड आढळून आला होता.