जियोच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 01:00 PM2021-06-15T13:00:15+5:302021-06-15T13:03:05+5:30

Airtel 5G Trial Gurugram: मे मध्ये सरकारने 5जी ट्रायलला दिलेल्या मंजुरीनुसार, Airtel ने 5G नेटवर्कचा ट्रायल गुरुग्राममध्ये सुरु केला आहे.  

Airtel 5g trial in gurugram got over 1gbps speed in testing   | जियोच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड 

जियोच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड 

Next

भारती एयरटेलने 5जी नेटवर्कचे ट्रायल गुरुग्राममध्ये सुरु केले आहेत. भारत सरकारने मेमध्ये भारतीय टेलीकॉम कंपन्यांना 5G च्या ट्रायल्सची मंजुरी दिली होती. या ट्रायल साईटवर कंपनीने 3500MHz बॅंडचा वापर करून 5G ची चाचणी केली आहे आणि या यातून 1Gbps इतका वेगवान स्पीड मिळाला आहे. (Airtel did 5g trial is live in gurugram with over 1gbps speed) 

एयरटेलचे 5G नेटवर्क गुरुग्राममधील सायबर हबमध्ये सुरु करण्यात आले आहे, हि माहिती 91mobiles च्या माध्यमातून समोर आली आहे. यानंतर कंपनी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बंगलोरमध्ये देखील आश्याचप्रकाराचे ट्रायल करणार आहे.  

एयरटेलच्या या ट्रायलमध्ये 5जी नेटवर्कवर 1Gbps पेक्षा जास्त स्पीड मिळाला आहे. सध्या देशात उपलब्ध असलेल्या 4G नेटवर्कपेक्षा हा वेग कितीतरी जास्त आहे. कंपनीने Qualcomm सोबत 5G साठी भागेदारी केली आहे. एयरटेल भारतात Qualcomm 5G RAN वर आधारित 5G नेटवर्क घेऊन येणार आहे.  

डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉम्युनिकेशनने टेलीकॉम कंपन्यांना शहरांसोबत ग्रामीण भागात देखील 5G चे ट्रायल करण्यास सांगितले आहे. डिपार्टमेंटने 4 मे, 2021 रोजी रिलायन्स जियो, भारती एयरटेल, वोडाफोन आयडिया आणि MTNL ला 5G ट्रायल्स करण्याची मंजुरी दिली होती.  

Web Title: Airtel 5g trial in gurugram got over 1gbps speed in testing  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.