मुंबईनंतर महाराष्ट्रातील आणखी एका शहरात एअरटेलची 5G सेवा लाँच; पुणे की आणखी कोणते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 20:16 IST2022-10-06T20:15:35+5:302022-10-06T20:16:21+5:30
Airtel 5G Plus Service : युजर्सना आता पूर्वीपेक्षा 20-30 पट अधिक वेगवान नेटवर्कची सुविधा मिळेल, ज्यामध्ये उत्कृष्ट साउंड एक्सपीरिएंस तसेच जबरदस्त कॉल कनेक्टिव्हिटीचा समावेश असेल, असे कंपनीने सांगितले.

मुंबईनंतर महाराष्ट्रातील आणखी एका शहरात एअरटेलची 5G सेवा लाँच; पुणे की आणखी कोणते?
नवी दिल्ली : भारती एअरटेलने (Airtel) आज (6 ऑक्टोबर 2022) आठ शहरांमध्ये 5G प्लस (Airtel 5G Plus) सेवा सुरू केली आहे. युजर्सना आता पूर्वीपेक्षा 20-30 पट अधिक वेगवान नेटवर्कची सुविधा मिळेल, ज्यामध्ये उत्कृष्ट साउंड एक्सपीरिएंस तसेच जबरदस्त कॉल कनेक्टिव्हिटीचा समावेश असेल, असे कंपनीने सांगितले.
टेलिकॉम कंपनीने पुढे सांगितले की, ही सेवा वापरण्यासाठी युजर्सना त्यांचे सिम कार्ड बदलावे लागणार नाही. त्यांना सर्व 5G सेवा फक्त सध्याच्या एअरटेल सिमवर मिळतील. अशात ज्या युजर्सकडे 5G फोन आहे, ते त्यांच्या सध्याच्या डेटा प्लॅनवर हाय-स्पीड एअरटेल 5G प्लसचा लाभ घेऊ शकतात, जोपर्यंत ते अधिक मोठ्या प्रमाणावर आणले जात नाही.
'या' 8 शहरांमध्ये 5G सेवा झाली सुरू
- दिल्ली
- मुंबई
- चेन्नई
- बंगलोर
- हैदराबाद
- सिलीगुडी
- नागपूर
- वाराणसी
या 8 शहरांमध्ये राहणारे युजर्स एअरटेल 5G प्लस सेवेचा आनंद घेऊ शकतात. याव्यतिरिक्त, वेळेसोबत त्याचे नेटवर्क वाढत जाईल, असे कंपनीने सांगितले.
Say Hello to Airtel 5G!#Airtel5GPlusLaunchpic.twitter.com/9YD6ApqBqS
— airtel India (@airtelindia) October 6, 2022
कंपनीचे सीईओ काय म्हणाले?
भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ गोपाल विट्टल म्हणाले की, "आमचे एअरटेल 5G प्लस नेटवर्क सध्याच्या एअरटेल सिम असलेल्या कोणत्याही 5G हँडसेटवर काम करेल. युजर्सना अधिक चांगला अनुभव देण्याची आमची उत्साह आता 5G सोबत आहे, जे पर्यावरणपूरक देखील आहे." याचबरोबर, एअरटेल 5G प्लस येत्या काळात कम्युनिकेट करण्यासाठी, कामासाठी आणि खेळासाठी टेक्नॉलॉजी पूर्णपणे बदलणार आहे. एअरटेल 5G प्लस हे अशा टेक्नॉलॉजीवर चालते, जी जगातील सर्वात प्रगत इकोसिस्टमसह स्वीकारले गेले आहे. भारतातील सर्व 5G स्मार्टफोन एअरटेल नेटवर्कवर अखंडपणे काम करतात याची आम्ही खात्री करू, असे गोपाल विट्टल यांनी सांगितले.
5G नेटवर्क अशी क्रांती आणेल
एअरटेल 5G प्लस गेमिंग, मल्टिपल चॅटिंग, हाय-डेफिनिशन व्हिडिओ स्ट्रीमिंग, फोटोंचे लगेच अपलोडिंग इत्यादींसाठी सुपरफास्ट ऍक्सेसची अनुमती देईल. भारती एअरटेलने गेल्या आठवड्यात देशात 5G चे अधिकृत लाँच केले. या लाँचमध्ये, एअरटेलने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासमोर स्मार्ट फार्मिंग सोल्यूशन्स तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्राथमिक आरोग्य सेवा बदलण्यासाठी 5G कनेक्टेड रुग्णवाहिकेचे प्रदर्शन केले होते.