Airtel 5G Plans Leaked: एअरटेल 5G चे प्लॅन्स लीक? 249 रुपयांपासून सुरु होणार रिचार्ज, Jio टेन्शनमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 14:49 IST2022-10-06T14:49:18+5:302022-10-06T14:49:41+5:30
Airtel 5G Plans Leak: रिलायन्स जिओने इन्व्हायटेड लोकांनाच ५जीची ट्रायल देण्यास सुरुवात केली आहे. तर एअरटेलच्या लोकांना त्यांच्या स्मार्टफोनवर ५जी चे सिग्नल दिसू लागले आहेत.

Airtel 5G Plans Leaked: एअरटेल 5G चे प्लॅन्स लीक? 249 रुपयांपासून सुरु होणार रिचार्ज, Jio टेन्शनमध्ये
देशात आता ५जीचे पर्व सुरु झाले आहे. एअरटेलने आठ शहरांत तर रिलायन्स जिओने चार शहरांत ५जी सेवा सुरु केली आहे. आता ग्राहक 5G रिचार्ज प्लान्सच्या घोषणेची वाट पाहत आहेत. अशातच एअरटेल ५जी चे संभाव्य प्लान्स लीक झाले आहेत. एअरटेल काही दिवसांतच प्लान्सदेखील जाहीर करण्याची शक्यता आहे.
रिलायन्स जिओने इन्व्हायटेड लोकांनाच ५जीची ट्रायल देण्यास सुरुवात केली आहे. तर एअरटेलच्या लोकांना त्यांच्या स्मार्टफोनवर ५जी चे सिग्नल दिसू लागले आहेत. म्हणजेच रेंज मिळू लागली आहे. परंतू, अद्याप त्यांना ५जीच्या स्पीडने डेटा सुरु झालेला नाही. हा डेटा ५जी प्लानचे रिचार्ज मारले की चालू होणार आहे.
एअरटेलने ५जीमध्ये आघाडी घेतली असली तरी जिओ आणि एअरटेलमध्ये प्राईस वॉर रंगण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार एअरटेल चार प्रकारचे ५जी प्लॅन आणू शकते. यामध्ये २४ दिवस, ५६ दिवस, ८४ दिवस आणि ३६५ दिवसांची वैधता असणार आहे. हे प्लॅन डेटानुसार विभागले जाणार आहेत.
एअरटेलचा सर्वात स्वस्त 5G रिचार्ज प्लॅन 249 रुपयांना येण्याची शक्यता आहे. या प्लॅनमध्ये 2 GB डेटा दिला जाईल. या प्लॅनमध्ये २४ दिवसांची वैधता दिली जाईल. 56 दिवसांच्या वैधतेसह एअरटेलचा दुसरा स्वस्त प्लॅन 499 रुपयांमध्ये येईल. यात सहा जीबी डेटा दिला जाईल. 365 दिवसांच्या वैधतेचा प्लान 1699 रुपयांना असेल यात एकूण 24 जीबी डेटा देण्यात येईल. हे सर्व स्वस्त प्लॅन आहेत.
डेली डेटा ऑफरचे प्लॅन
- एअरटेलचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन 2399 रुपयांचा असेल. 365 दिवसांची वैधता व दररोज १.५ जीबी डेटा मिळेल.
- 56 दिवसांच्या वैधतेचा प्लान 699 रुपयांना असेल. यात दररोज १.५ जीबी डेटा दिला जाईल. 56 दिवसांचा आणखी एक प्लॅन 799 रुपयांना असेल. यात 2.5 GB डेटा दिला जाण्याची शक्यता आहे.
- एअरटेल ८४ दिवसांमध्ये देखील प्लॅन आणणार आहे. एक प्लॅन 849 रुपयांना दररोज 1.5 GB डेटा दिला जाईल. दुसरा प्लॅन 949 रुपयांचा असेल व दररोज २.५ जीबी डेटा दिला जाईल.