शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

नोकिया, सॅमसंगनंतर आता मोटरोलानेही स्मार्टफोनच्या किंमती घटवल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 18:49 IST

मोटोरोलाचे फोन हे चांगल्या दर्जाच्या कॅमेरासाठी ओळखले जातात.

नवी दिल्ली : सणासुदीमध्ये विक्रीचे उच्चांक गाठल्यानंतर नोकिया, सॅमसंग, शाओमी सारख्या मोबाईल निर्मात्या कंपन्यांनी आपल्या स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्यानंतर लिनोव्होच्या मालकीच्या मोटोरोलानेही लेटेस्ट स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये घट केली आहे. Moto G6 या काही महिन्यांपूर्वीच लाँच केलेल्या फोनच्या किंमतीमध्ये तब्बल 2000 रुपयांची घट करण्यात आली आहे. तर फ्लिपकार्टवर सध्या हा फोन यापेक्षा कमी किंमतीमध्ये उपलब्ध आहे.

 मोटोरोलाचे फोन हे चांगल्या दर्जाच्या कॅमेरासाठी ओळखले जातात. तसेच या फोनला गुगलचा सपोर्ट असल्याने नव्याने येणाऱ्या ऑपरेटींग सिस्टिम या फोनना दिल्या जातात. यामुळे कमी खर्चात नवे तंत्रज्ञान वापरणाऱ्या ग्राहकांसाठी मोटरोला कंपनीचे मोबाईल पर्वणीच ठरतात. 

Moto G6 ला यंदाच्या जूनमध्ये 3जीबी रॅम, 32 जीबी स्टोरज आणि 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले होते. या फोनची किंमत 13,999 रुपयांपासून सुरु होत होती. तर 4 जीबीच्या व्हेरिअंटची किंमत 15,999 होती. आता हीच किंमत अनुक्रमे 11,999 रुपये आणि 13,999 रुपये झाली आहे. तर फ्लिपकार्टवर हा फोन 10,999 आणि 12,999 रुपयांना मिळत आहे. 

काय आहे Moto G6 मध्ये ? फोनच्या फिचर्सवर बोलायचे झाल्यास यामध्ये 5.7 इंचाचा फुलएचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा अस्पेक्ट रेशो 18:9 आहे. सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे. तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 एसओसी चिपसेटचा प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनची स्टोरेज स्पेसही वाढविता येते. रिअरला 12 एआय सेन्सर आणि 5 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरी 3000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. 

टॅग्स :MobileमोबाइलFlipkartफ्लिपकार्टsamsungसॅमसंगNokiaनोकिया