टंबो मोबाईल्सचा किफायतशीर दराचा हँडसेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 17:58 IST2018-07-17T17:57:49+5:302018-07-17T17:58:21+5:30
टंबो मोबाईल्स या कंपनीने किफायतशीर दरात सुपरफोन टीए-४ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.

टंबो मोबाईल्सचा किफायतशीर दराचा हँडसेट
टंबो मोबाईल्स या कंपनीने किफायतशीर दरात सुपरफोन टीए-४ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.
टंबो मोबाईल्सने भारतीय बाजारपेठेत याआधी सादर केलेले सर्व मॉडेल्स हे एंट्री लेव्हल या प्रकारातील आहेत. या अनुषंगाने सुपरफोन टीए-४ हे मॉडेलदेखील याच प्रकारातील आहे. देशभरातील विविध शॉपीजमधून हे मॉडेल ग्राहकांना ६,९९९ रूपये मूल्यात खरेदी करण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे. यासोबत कंपनीने एक वर्षासाठी वन-टाईम स्क्रीन रिप्लेसमेंट वॉरंटी दिली आहे. तर २०० दिवसांपर्यंत खराबी आल्यास हँडसेट रिप्लेस करता येणार आहे. यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा असून यात ड्युअल एलईडी फ्लॅश प्रदान करण्यात आला आहे. हे सेन्सर सॅमसंग कंपनीचे असल्यामुळे याच्या मदतीने अतिशय दर्जेदार प्रतिमा काढता येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. यात फेस ब्युटी, बर्स्ट मोड, पॅनोरामा, स्टीकर्स आदी फिचर्स देण्यात आले आहेत.
सुपरफोन टीए-४ या मॉडेलमध्ये ५.४५ इंच आकारमानाचा तथा १८:९ असा अस्पेक्ट रेशो असणारा आयपीएस डिस्प्ले दिलेला असून यावर २.५ डी वक्राकार ग्लासचे आवरण देण्यात आले आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ६४ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे असून यात ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.