जुना फोन घेऊन फसू नका; 'ही' वेबसाईट सांगणार डिव्हाईस चोरीचा आहे की नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 10:51 AM2021-07-20T10:51:02+5:302021-07-20T11:02:08+5:30

Old mobile Phones : देशात नव्या स्मार्टफोन्सप्रमाणे जुने स्मार्टफोन्सही मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. 

adviced to check imei number second hand phone zipnet website delhi police know more | जुना फोन घेऊन फसू नका; 'ही' वेबसाईट सांगणार डिव्हाईस चोरीचा आहे की नाही

जुना फोन घेऊन फसू नका; 'ही' वेबसाईट सांगणार डिव्हाईस चोरीचा आहे की नाही

googlenewsNext
ठळक मुद्देदेशात नव्या स्मार्टफोन्सप्रमाणे जुने स्मार्टफोन्सही मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. पोलिसांनी सेकंड हँड स्मार्टफोन्सची खरेदी करणाऱ्यांना एक सल्ला दिला आहे.

देशात जितक्या प्रमाणात नवे मोबाईल फोन्स खरेदी केले जातात. तितक्याच प्रमाणात जुने स्मार्टफोन्सही खरेदी केले जातात. OLX आणि Quikr सारख्या वेबसाईट्सवरूनही हे स्मार्टफोन्स निवडणं सोपं होतं. अनेकदा सेकंड हँड़ स्मार्टफोन्समुळे तुम्हाला समस्यांचा सामनाही करावा लागू शकतो. अनेक ठिकाणी ग्राहकांना चोरीचे स्मार्टफोन्सही विकण्यात येतात. यासाठी दिल्लीपोलिसांनी अशा कोणत्याही प्रकरणातून वाचण्यासाठी सल्ला दिला आहे. 

दिल्लीपोलिसांनी सेकंड हँड स्मार्टफोन्सची खरेदी करणाऱ्यांना एक सल्ला दिला आहे. ज्यावेळी तुम्ही कोणतंही डिव्हाईस खरेदीकराल तेव्हा त्याचा IEMI नंबर नक्की व्हेरिफाय करा. तसंच IMEI नंबर तपासण्यासाठी पोलिसांनी Zipnet या वेबसाईटचा वापर केला आहे, "सेकंड हँड स्मार्टफोन खरेदी करताना सावध राहा. हे स्मार्टफोन चोरी किंवा कोणत्या गुन्ह्यातही वापरलेले असू शकतात. अशा फोन्सच्या आयएमईआयला दिल्ली पोलिसांच्या Zipnet या सिस्टमवर लिस्ट केलं जातं," असं पोलिसांनी सांगितलं. 


असा करा IMEI चेक
जेव्हा तुम्ही सेकंड हँड फन खरेदी कराल तेव्हा फोनमध्ये *#06# डायल करा. त्यानंतर तुमचा आयएमईआय क्रमांक डिस्प्ले होईल. त्यानंतर https://zipnet.delhipolice.gov.in/ या वेबसाईटवर जा आणि त्या ठिकाणी असलेल्या Missing Mobile या पर्यायावर क्लिक करा. च्यानंतर IMEI टाकून  सर्च करा. जर तुमचा फोन कोणत्याही चोरी किंवा गुन्ह्यात वापरला गेला असेल तर डेटाबेसमध्ये दिसून येईल. 

Web Title: adviced to check imei number second hand phone zipnet website delhi police know more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.