Aadhaar Card हरवलं? फसवणुकीची भीती? एका SMS द्वारे कार्ड लॉक करा; जाणून घ्या प्रोसेस...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 15:29 IST2023-03-03T15:29:18+5:302023-03-03T15:29:46+5:30
Aadhaar कार्डद्वारे अनेकदा फसवणूक केली जाते, पण तुम्ही या फसवणुकीपासून स्वतःला वाचवू शकता.

Aadhaar Card हरवलं? फसवणुकीची भीती? एका SMS द्वारे कार्ड लॉक करा; जाणून घ्या प्रोसेस...
Aadhaar Safety Tips :आधार कार्ड भारतीयांच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. आधार कार्डचा जवळपास सर्वच सरकारी कामात उपयोग होतो. पण, या कार्डद्वारे अनेकदा फसवणुकही केली जाते. तुम्हीही अनेकदा आधार कार्डशी संबंधित फसवणुकीच्या बातमी ऐकल्या असतील. ही फसवणूक दिवसेंदिवस वाढत असून आधार कार्ड हरवले तर त्याचा गैरवापर होणार नाही, अशी टेन्शन अनेकांना असते. प
तुम्ही आता घरबसल्या तुमचे आधार कार्ड एका एसएमएसद्वारे लॉक करू शकता. यामुळे तुमचा सर्व डेटा सुरक्षित राहील आणि ऑनलाइन फसवणूक होणार नाही. एसएमएसद्वारे आधार क्रमांक लॉक कसा करायचा? जर तुमचे आधार कार्ड हरवले असेल आणि तुम्हाला ऑनलाइन फसवणुकीची भीती वाटत असेल, तर घरबसल्या तुम्ही एसएमएस सेवेद्वारे तुमचा आधार क्रमांक लॉक करू शकता. चला जाणून घेऊया कसे...
1. मेसेजमध्ये GETOTP आधार क्रमांकाचे 4 किंवा 8 क्रमांक लिहा आणि 1947 वर पाठवा.
2. नंतर लॉकिंग विनंतीसाठी, या नंबरवर > LOCKUID लास्ट 4 किंवा 8 अंकी आधार क्रमांक आणि OTP पुन्हा पाठवा.
3. यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज मिळेल.
4. जर तुम्ही तुमचा आधार क्रमांक एकदा लॉक केला असेल, तर त्यानंतर तुम्ही त्याचा वापर करुन कोणतीही पडताळणी करू शकत नाही.
sms द्वारे आधार कार्ड अनलॉक कसे करावे?
1. मेसेजमध्ये GETOTP आधार क्रमांकाचे 4 किंवा 8 क्रमांक लिहा आणि 1947 वर पाठवा.
2. त्यानंतर अनलॉकिंग विनंतीसाठी 4 किंवा 8 अंकी आधार क्रमांक आणि OTP पुन्हा या नंबरवर पाठवा.
3. यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज मिळेल आणि तुमचा आधार क्रमांत अनलॉक होईल.