'123456' सारखा पासवर्ड 1 सेकंदात होतो क्रॅक; 'हे' आहेत 20 कमकुवत पासवर्ड!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 02:07 PM2023-11-17T14:07:58+5:302023-11-17T14:08:34+5:30

NordPass च्या रिपोर्टनुसार, जवळपास 20 पासवर्ड असे समोर आले आहेत, जे भारतीय सामान्यतः सर्वात जास्त वापरतात.

A password like '123456' is cracked in 1 second; Here are 20 Weak Passwords! | '123456' सारखा पासवर्ड 1 सेकंदात होतो क्रॅक; 'हे' आहेत 20 कमकुवत पासवर्ड!

'123456' सारखा पासवर्ड 1 सेकंदात होतो क्रॅक; 'हे' आहेत 20 कमकुवत पासवर्ड!

देशात सायबर क्राईमच्या (CyberCrime) घटना झपाट्याने वाढत आहेत, अशा परिस्थितीत सतर्क राहणे आणि मजबूत पासवर्ड तयार करणे, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त एक स्ट्रॉंग पासवर्ड तुमचे पर्सनल आणि सोशल अकाउंट सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकतो, परंतु पासवर्ड तयार करताना, लोक सहसा इतका सोपा पासवर्ड तयार करतात की, तो क्रॅक करणे हॅकर्ससाठी फक्त 1 सेकंदाचा खेळ आहे.

NordPass च्या रिपोर्टनुसार, जवळपास 20 पासवर्ड असे समोर आले आहेत, जे भारतीय सामान्यतः सर्वात जास्त वापरतात. यासोबतच हे पासवर्ड क्रॅक करण्यासाठी हॅकर्सना किती वेळ लागतो, याचाही रिपोर्टमध्ये उल्लेख आहे. रिपोर्टनुसार, 123456, admin, 12345678, 12345, password, 123456789, 1234567890, administrator, Password असे  काही पासवर्ड आहेत, जे हॅकर्सना क्रॅक करण्यासाठी 1 सेकंद लागतो. 

याचबरोबर, admin123 आणि Password@123 क्रॅक करण्यासाठी 11 सेकंद आणि 2 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो. Pass@123 असा पासवर्ड 5 मिनिटांत क्रॅक होऊ शकतो, तर Welcome@123 हा पासवर्ड 10 मिनिटांत क्रॅक होऊ शकतो. याशिवाय Pass@1234, Abcd@1234, Abcd@123, UNKNOWN सारखे पासवर्ड 17 मिनिटांत क्रॅक होतात. तसेच, रिपोर्टनुसार, admin@123 असा पासवर्ड 34 मिनिटांत, India@123 हा पासवर्ड 3 तासांत आणि Admin@123 असा पासवर्ड 1 वर्षात क्रॅक होऊ शकतो. 

कसा तयार करावा सुरक्षित पासवर्ड?
जेव्हाही पासवर्ड बनवला जातो, तेव्हा मनात एकच प्रश्न फिरू लागतो की एक मजबूत पासवर्ड कसा बनवायचा, जो खाते हॅकर्सपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करेल. तुमच्या अकाउंटसाठी पासवर्ड तयार करताना फक्त स्मॉल कॅरेक्टरचा (अक्षरे) वापर नाही, तर कॅपिटल कॅरेक्टरचाही वापर करावा. इतकेच नाही तर एक मजबूत पासवर्ड तयार करण्यासाठी सिंबल, नंबर इत्यादी वापरा आणि इतका मजबूत पासवर्ड तयार करा की, हॅकर्स सहजपणे क्रॅक करू शकत नाहीत.

Web Title: A password like '123456' is cracked in 1 second; Here are 20 Weak Passwords!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.