एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 19:53 IST2025-08-03T19:52:07+5:302025-08-03T19:53:03+5:30

'चॅटजीपीटीवरील तुमचे खाजगी संभाषण गुगलवर इंडेक्स केले जात असल्याचा दावा एका अहवालाने केला आहे.

A feature could leak ChatGPT chats! Private things showing up in Google search? | एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?

एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?

सध्या चॅटजीपीटीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आपण साध्या साध्या गोष्टीही चॅटजीपीटीसोबत शेअर करतो. पण, आता सावध रहा. चॅटजीपीटीवरील प्रायव्हेट संभाषण गुगल इंडेक्स केले जात असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. 

ChatGPT वरील तुमचे खाजगी संभाषण गुगलवर इंडेक्स केले जात आहे, म्हणजेच कोणीही या चॅट्स सहजपणे वाचू शकतात, म्हणजेच तुमची गोपनीयता धोक्यात आहे आणि कोणीही तुमचे चॅट पाहू शकतो. 

भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...

एका अहवालानुसार, चॅटजीपीटी चॅट्स लीक होण्याचे कारण त्याचे चॅट शेअर फीचर आहे. या फीचरद्वारे, वापरकर्ते त्यांचे चॅट पब्लिक लिंकमध्ये रूपांतरित करू शकतात. एकदा लिंक तयार झाली की, कोणीही हे चॅट पाहू शकते. अनेकांना या लिंक्स सर्च इंजिनद्वारे देखील अॅक्सेस केल्या जाऊ शकतात याची माहिती नाही.

'site:chatgpt.com/share' सारख्या साध्या शोधाचा वापर करून गुगलवर ४ हजारांहून अधिक चॅट्स आधीच इंडेक्स करण्यात आल्या आहेत. आता ते तपासल्यावर कोणतेही परिणाम दिसत नाहीत. या लिंक्समध्ये वापरकर्त्यांच्या आरोग्य समस्या, नातेसंबंध, कामाच्या ठिकाणी समस्या आणि अगदी व्यवसाय योजना आणि ईमेलशी संबंधित माहितीचा समावेश आहे.

ChatGPT चॅट्स कसे लीक झाले?

अहवालानुसार, ज्यावेळी एखादा वापरकर्ता ChatGPT मधील शेअर बटणावर टॅप करतो तेव्हा एक पब्लिक लिंक तयार होते. ही  कोणीही उघडू शकते आणि तपासू शकते. जरी तुमचे नाव त्या लिंकमध्ये नसले तरी, जर तुम्ही संभाषणात स्वतःबद्दल कोणतीही वैयक्तिक गोष्ट जसे की नाव, कंपनी, ईमेल किंवा कोणतेही विशेष ठिकाण नमूद केले असेल तर ते Google मध्ये दाखवले जाऊ शकते. यामुळे तुमची गोपनीयता धोक्यात येऊ शकते.

Web Title: A feature could leak ChatGPT chats! Private things showing up in Google search?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.