5G Launched in India: 5G साठी कमीतकमी १५ हजार खर्च करावा लागणार; तरच वापरता येणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 03:09 PM2022-10-01T15:09:31+5:302022-10-01T15:10:19+5:30

5G Launched in India: एअरटेलने काही दिवसांपूर्वी आपण नवीन ५जी सिम तयार केल्याचे म्हटले आहे.

5G network will cost at least 15 thousand rupees; no new Sim, but New Mobile And Plan | 5G Launched in India: 5G साठी कमीतकमी १५ हजार खर्च करावा लागणार; तरच वापरता येणार...

5G Launched in India: 5G साठी कमीतकमी १५ हजार खर्च करावा लागणार; तरच वापरता येणार...

googlenewsNext

देशात आजपासून ५जी नेटवर्कची घोषणा झाली आहे. एअरटेलने आजपासून आठ शहरांत ५जी सेवा सुरु करणार असल्याचे म्हटले आहे. तर रिलायन्सने दिवाळीपर्यंत देशातील महत्वाच्या शहरांमध्ये सेवा सुरु करणार असल्याचे म्हटले आहे. व्होडाफोनचा तर पत्ताच नाहीय. अशावेळी तुम्हाला ५जी कसे वापरता येणार? त्यासाठी सिमकार्ड बदलावे लागणार की मोबाईल आदीची माहिती घेणे महत्वाचे आहे. 

5G Launched in India: एअरटेल की रिलायन्स? कोणाचे 5G नेटवर्क पहिले सुरु होणार; मित्तलांनी अंबानींना ऐकवलेच

नवा मोबाईल घेतला असेल तर सर्वात महत्वाचे म्हणजे त्याचे बँडस् कोणते आहेत ते. १०-११ हजारापासून ५जी फोन बाजारात आहेत. त्यामध्ये दोन बँडपासून बँड सुरु होतात. काही मोबाईलमध्ये पाच, सात, ११ आणि १३ असे बँड्स देण्यात आले आहेत. कमी बँडच्या स्मार्टफोनवर रिलायन्सची सेवा मिळू शकते, परंतू तिचा वेगही कमी असण्याची शक्यता आहे. म्हणजे ४जी पेक्षा थोडा जास्त असेल परंतू एअरटेलच्या हाय बँडपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. यासाठी कमीतकमी १५ हजारांचा स्मार्टफोन घ्यावा लागणार आहे. 

आता प्रश्न उरतो तो सिमकार्डचा. एअरटेलने काही दिवसांपूर्वी आपण नवीन ५जी सिम तयार केल्याचे म्हटले आहे. परंतु, तुम्ही वापरत असलेल्या ४जी सिमवरच ५जी नेटवर्क वापरता येणार आहे. या दोन्ही नेटवर्कच्या सिममधील टेक्निकमध्ये फारसा फरक नाहीय. सिमच्या माध्यमातून तुम्हाला युनिक आयडी दिला जातो. त्यानुसार तुमचे नेटवर्क आणि प्लान अॅक्टिव्ह असतो. यामुळे तुम्हाला नवीन सिम घेण्याची गरज पडणार नाही. 

जसे ४जी सोबत झाले तसेच ५जी सोबत होणार आहे. तुम्हाला ५जी वापरण्यासाठी ५जी फोनच वापरावा लागणार आहे. जर कंपन्यांनी खास ५जी सिम दिले तर सिमकार्डच्या साईजमध्ये देखील कोणताही बदल असणार नाही. परंतू, 5G SIM असले काय आणि 4G SIM असले काय, तुम्ही तेव्हाच ५जी नेटवर्क वापरू शकता जेव्हा तुम्ही ५जी चे रिचार्ज मारणार. म्हणजेच ५जी च्या प्लॅननुसार तुम्हाला डेटा वापरता येणार आहे. 

'आज 130 कोटी भारतीयांना 5G च्या रूपाने एक अद्भुत भेट मिळत आहे. 5G नव्या युगाची दार ठोठावत आहे. ही अनेक संधींची सुरुवात आहे. यासाठी मी प्रत्येक भारतीयाचे खूप खूप अभिनंदन करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशात 5G सेवांचा शुभारंभ करण्यात आला. याअगोदर देशाला बाहेरुन मोबाईल आयात करावे लागत होते, पण आता देश मोबाईल निर्यात करत आहे. जगात भारत मोबाईल निर्मिती करण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आत्मनिर्भर भारताने हे करुन दाखवले आहे, असंही मोदी म्हणाले.

Web Title: 5G network will cost at least 15 thousand rupees; no new Sim, but New Mobile And Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :5G५जी