मोटरलानं केली कमाल! दिवसभर टिकणाऱ्या बॅटरीसह दमदार Moto G42 स्मार्टफोनची एंट्री  

By सिद्धेश जाधव | Published: June 9, 2022 02:47 PM2022-06-09T14:47:29+5:302022-06-09T14:47:42+5:30

Moto G42 स्मार्टफोनमध्ये Snapdragon 680 प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.  

50MP camera and 5000mAh battery featured Moto G42 smartphone launched | मोटरलानं केली कमाल! दिवसभर टिकणाऱ्या बॅटरीसह दमदार Moto G42 स्मार्टफोनची एंट्री  

मोटरलानं केली कमाल! दिवसभर टिकणाऱ्या बॅटरीसह दमदार Moto G42 स्मार्टफोनची एंट्री  

Next

Motorola नं आपला बजेट फ्रेंडली स्मार्टफोन Moto G42 ब्राजीलमध्ये लाँच केला आहे. आज कंपनीनं दक्षिण अमेरिकेत दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. ज्यात एका Moto G62 आणि Moto G42 या दोन 5G स्मार्टफोन्सचा समावेश आहे. जो क्वालकॉमच्या Snapdragon 6 सीरीज प्रोसेसर, 50MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह ग्राहकांच्या भेटीला आला आहे. कंपनीनं या हँडसेटचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जगासमोर ठेवले आहेत परंतु किंमत आणि उपलब्धतेची माहिती दिली नाही.  

Moto G42 चे स्पेसिफिकेशन्स 

Moto G42 स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा Full HD+ g-OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन, 20:9 अस्पेक्ट रेश्यो आणि 60Hz रिफ्रेश रेट आहे. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 20W TurboCharge टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. बेसिक कनेटिव्हिटी फीचर्स तर मिळतात सोबत Dolby Atmos सपोर्ट असलेले ड्युअल स्टीरियो स्पिकर देण्यात आले आहेत. 

मोटोरोलाच्या या फोनमध्ये 16 MP चा सेल्फी कॅमेरा आहे. रियर कॅमेरा सेटअप पाहता, Moto G42 स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. प्रायमरी कॅमेऱ्यासह 8-मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे.  

मोटोरोलाचा हा फोन Android 12 OS वर चालतो. मोटोरोलाच्या या फोनमध्ये क्वालकॉमचा Snapdragon 680 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रो एसडी कार्डनं वाढवता येते. Moto G42 मध्ये फेस अनलॉक आणि साईड फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. 

Web Title: 50MP camera and 5000mAh battery featured Moto G42 smartphone launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.