साडे सहा हजारांत ५० मेगापिक्सलचा फोन; ६.६ इंचाचा डिस्प्लेही, नवा स्मार्टफोन लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 09:41 IST2024-01-14T09:41:28+5:302024-01-14T09:41:50+5:30

फोरजी नेटवर्कवर काम करणारा आहे. 

50 megapixel phone Infinix Smart 8 launched for six and a half thousand; 6.6 inch display also, new smartphone launch | साडे सहा हजारांत ५० मेगापिक्सलचा फोन; ६.६ इंचाचा डिस्प्लेही, नवा स्मार्टफोन लाँच

साडे सहा हजारांत ५० मेगापिक्सलचा फोन; ६.६ इंचाचा डिस्प्लेही, नवा स्मार्टफोन लाँच

इन्फिनिक्सने साडे सहा हजारांत ५० मेगापिक्सल कॅमेरावाला स्मार्टफोन लाँच केला आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारीत लाँच झालेल्या Infinix Smart 7 चा हा सक्सेसर फोन आहे. ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि ऑक्टॉकोअर प्रोसेसर यामध्ये देण्यात आला आहे. 

Infinix Smart 8 मध्ये एकच कॉन्फिग्रेशन देण्यात आले आहे. तसे तर या फोनची किंमत ७४९९ रुपये आहे. परंतु, सध्या लाँचिंग ऑफरमध्ये तो ६७४९ रुपयांमध्ये मिळत आहे. यामध्ये 4GB RAM + 64GB स्टोरेज देण्यात आले आहे. 

गॅलेक्सी व्हाइट, रेनबो ब्लू, सायन गोल्ड आणि टिंबर ब्लॅक अशा चार रंगांमध्ये स्मार्टफोन येतो. Infinix Smart 8 मध्ये 6.6-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे जो HD+ रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटचा आहे. ऑक्टाकोर मीडियाटेक हेलिओ जी३६ प्रोसेसर देण्यात आला असून Android 13 वर आधारित XOS 13 वर काम करतो.

यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. मुख्य लेन्स 50MP आहे. फ्रंटला 8MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सुरक्षेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन फोरजी नेटवर्कवर काम करणारा आहे. 

Web Title: 50 megapixel phone Infinix Smart 8 launched for six and a half thousand; 6.6 inch display also, new smartphone launch