दररोज २ जीबी डेटा अन् ७२ दिवसांची वैधता; BSNL ने लॉन्च केला सर्वात स्वस्त प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 13:16 IST2025-09-05T13:16:03+5:302025-09-05T13:16:12+5:30
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी BSNL ने आणखी एक स्वस्त रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे.

दररोज २ जीबी डेटा अन् ७२ दिवसांची वैधता; BSNL ने लॉन्च केला सर्वात स्वस्त प्लॅन
BSNL सातत्याने आपल्या नेटवर्कमध्ये सुधारणा करत नवीन युजर्स जोडण्याचा प्रयत्न करत आहे. शिवाय, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्लॅन्सही आणत आहे. आता BSNL ने ७२ दिवसांच्या वैधतेसह एक स्वस्त प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये युजरला दररोज २ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंगसह अनेक फायदे मिळतील.
ट्रायच्या एका अहवालानुसार, बीएसएनलच्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. ऑगस्टमध्ये कंपनीने नवीन युजर्स जोडण्यासाठी १ रुपयांचा प्लॅन देखील लॉन्च केला, ज्यामध्ये ३० दिवसांची वैधता, दररोज २ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि मोफत एसएमएसचे फायदे होते. बीएसएनएलची ही फ्रीडम ऑफर नवीन ग्राहकांसाठी होती. बीएसएनएलची ही १ रुपयांची ऑफर ३१ ऑगस्ट रोजी संपणार होती, जी कंपनीने आता १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.
७२ दिवसांचा प्लॅन
बीएसएनएलने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून हा स्वस्त प्लॅन जाहीर केला आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये ७२ दिवसांची वैधता मिळते. ४८५ रुपयांच्या या स्वस्त प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि मोफत राष्ट्रीय रोमिंगचा फायदा मिळतो. तसेच, बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन दररोज २ जीबी हाय स्पीड डेटा आणि १०० मोफत एसएमएससह येतो.
याशिवाय बीएसएनएल आपल्या सर्व मोबाइल ग्राहकांना बीआयटीव्हीची सुविधा देत आहे. यामध्ये ३५० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल आणि ओटीटी अॅप्सची सुविधा मिळेल. एवढेच नाही, तर कंपनीने अलीकडेच बीआयटीव्हीचा प्रीमियम प्लॅन देखील सादर केला आहे. १५१ रुपयांच्या प्लॅनमध्ये ४५० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल, २३ हून अधिक ओटीटी अॅप्स इत्यादी सुविधा देण्यात आल्या आहेत.