200MP कॅमेरा अन् 7000mAh बॅटरी, Realme लॉन्च केला तगडा स्मार्टफोन, किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 19:53 IST2025-10-21T19:52:41+5:302025-10-21T19:53:11+5:30
Realme ने आपले दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.

200MP कॅमेरा अन् 7000mAh बॅटरी, Realme लॉन्च केला तगडा स्मार्टफोन, किंमत...
Realme ने आपले दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. दोन्हीही फोन्समध्ये 7000mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 8 Elite Gen 5 प्रोसेसर देण्यात आले आहे. पण, या स्मार्टफोन्सची खासियत म्हणजे, याचा 200MP टेलिफोटो कॅमेरा. सध्या हे फोन चीनमध्ये लॉन्च केले असून, लवकरच भारतात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.
Realme GT 8 Pro ड्युअल सिम सपोर्ट करतो. यात 6.79 इंचाचा QHD+ AMOLED डिस्प्ले आहे, ज्याची कमाल ब्राइटनेस 7000 निट्स आहे.
या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 144Hz रिफ्रेश रेटसाठी सपोर्ट करणारा 2K रिझोल्यूशन डिस्प्ले मिळतो. तसेच, हे दोन्ही फोन IP69+IP68+IP66 रेटिंगसह येतात.
यात 16 जीबी रॅम आणि 1 टीबी पर्यंत स्टोरेज मिळेल. या फोनचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याची 7000 एमएएच बॅटरी. याचे प्रो मॉडेल 120 वॅट आणि 100 वॅट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करतो.
प्रो मॉडेलमध्ये 50 एमपी प्रायमरी कॅमेरा, 50 एमपी अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि 200 एमपी टेलिफोटो लेन्स आहेत. कंपनीने फ्रंटला 32 एमपी सेल्फी कॅमेरा दिला आहे. दुसरीकडे, Realme GT 8 मध्ये 50 एमपी प्रायमरी कॅमेरा, 8 एमपी अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि 50 एमपी टेलिफोटो लेन्स दिला आहे.
किंमत काय आहे?
Realme GT8 हा 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेजच्या बेस कॉन्फिगरेशनमध्ये येतो. या व्हेरिएंटची किंमत 2,899 युआन (अंदाजे 35,850 रुपये) आहे. तर, 16 जीबी रॅम + 1 टीबी स्टोरेजमध्ये येणारा टॉप व्हेरिएंट 4,099 युआन (अंदाजे 50,690 रुपये) आहे.
तसेच, प्रो व्हेरिएंट 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेजच्या बेस व्हेरिएंटमध्ये येतो. त्याची किंमत 3,999 युआन (अंदाजे 49,440 रुपये) आहे. तर, 16 जीबी रॅम + 1 टीबी स्टोरेजवाला व्हेरिएंट 5,199 युआन (अंदाजे 64,280 रुपये) आहे.