शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

फेसबुकवर 20 कोटी बनावट खाती असल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 09:03 IST

फेसबुकवर जगभरात 20 कोटी बनावट किंवा दुहेरी खाती (एकाच व्यक्तीचे दोन अकाऊंट) असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई- फेसबुकचा सगळीकडेच वारेमाप वापर केला जातो. फेसबुकचा वापर न करणाऱ्या व्यक्ती क्वचितच सापडतील. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच जण फेसबुकचा वापर करतात. याच सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. फेसबुकवर जगभरात 20 कोटी बनावट किंवा दुहेरी खाती (एकाच व्यक्तीचे दोन अकाऊंट) असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 20 कोटी बनावट खात्यापैकी बरीच खाती भारत, इंडोनेशिया आणि फिलिपिन्स या देशांमधील आहेत. फेसबुकने केलेल्या ताज्या पाहणीत ही आकडेवारी उघड झाली. गेल्या काही वर्षांत फेसबुकसारख्या समाजमाध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

 ३१ डिसेंबर २०१६ अखेर फेसबुकचे १.८६ अब्ज वापरकर्ते (मंथली अ‍ॅक्टिव्ह युजर्स -मासिक सक्रिय वापरकर्ते) होते. त्यापैकी सहा टक्के, म्हणजे ११४ दशलक्ष खाती बनावट होती. पुढील वर्षांत एकूण वापरकर्ते आणि बनावट खात्यांमध्येही मोठी वाढ झाली. ३१ डिसेंबर २०१७ अखेर जगात फेसबुकचे २.१३ अब्ज वापरकर्ते (मंथली अ‍ॅक्टिव्ह युजर्स) होते. १० टक्के खाती बनावट असल्याचं समोर आलं.

खोट्या किंवा बनावट खात्यांची नेमकी संख्या मोजणं अवघड आहे. त्यांचा साधारण अंदाज लावता येऊ शकतो. सध्या जगातील २० कोटी खाती बनावट किंवा खोटी असल्याचा फेसबुकचा अंदाज आहे. प्रत्यक्ष आकडा यापेक्षा कमी किंवा जास्तही असू शकतो, असं फेसबुकचं म्हणणं आहे. मंथली अ‍ॅक्टिव्ह युजर्सबरोबरच डेली अ‍ॅक्टिव्ह युजर्सही (दैनंदिन सक्रिय वापरकर्ते) गेल्या वर्षांत बरेच वाढले आहेत. जगात २०१६ साली फेसबुकचे १.२३ अब्ज डेली अ‍ॅक्टिव्ह युजर्स होते. २०१७ साली त्यात १४ टक्क्यांनी वाढ होऊन ही संख्या १.४० अब्ज डेली अ‍ॅक्टिव्ह युजर्सवर गेली. फेसबुकच्या या प्रसारामध्ये भारत, इंडोनेशिया, फिलिपिन्स अशा देशांतील नागरिकांनी मोठा सहभाग आहे.   

टॅग्स :technologyतंत्रज्ञानFacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडिया