फक्त ₹5 मध्ये दररोज 2 GB डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंग; BSNL च्या प्लानने एअरटेल-जिओला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 17:13 IST2025-12-21T17:13:09+5:302025-12-21T17:13:26+5:30
खासगी टेलिकॉम कंपन्या रिचार्जचे दर वाढवणार असल्याची चर्चा आहे.

फक्त ₹5 मध्ये दररोज 2 GB डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंग; BSNL च्या प्लानने एअरटेल-जिओला धक्का
BSNL: खासगी टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा मोबाईल रिचार्ज दर वाढवण्याच्या तयारीत असताना, सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. BSNL ने असा एक किफायतशीर रिचार्ज प्लान आणला आहे, ज्यामध्ये दररोजचा 5 रुपयांपेक्षाही कमी किमतीत अनेक फायदे मिळतात.
कमी किंमत, जास्त वैधता
BSNL चा हा प्लान ₹347 रुपयांचा असून, त्याची वैधता 56 दिवसांची आहे. दररोजचा खर्च पाहता, हा प्लान सुमारे ₹5 प्रतिदिन पडतो. या कमी किमतीत मिळणारे फायदे सर्वसामान्य युजर्ससाठी अत्यंत आकर्षक मानले जात आहेत.
अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ
या प्लानची सर्वात मोठी वैशिष्ट्ये म्हणजे भारतभर कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि फ्री रोमिंग कॉल्समुळे वारंवार प्रवास करणाऱ्या ग्राहकांना वेगळा रिचार्ज करण्याची गरज भासत नाही.
दररोज 2GB हाय-स्पीड डेटा
डेटा वापरकर्त्यांसाठीही BSNL ने या प्लानमध्ये विशेष सुविधा दिल्या आहेत. दररोज 2GB हाय-स्पीड डेटा, एकूण वैधतेत जवळपास 100GB डेटा मिळतो. हा डेटा स्ट्रीमिंग, सोशल मीडिया, ऑनलाइन कामकाज आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी पुरेसा आहे.
मोफत SMS सुविधा
या प्लानमध्ये दररोज 100 मोफत SMS बँकिंग अलर्ट्स, OTP आणि महत्त्वाचे मेसेज पाठवण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरते.