वनप्लसशी पंगा घेण्यासाठी आला शक्तिशाली POCO F4 5G; किंमत 24 हजारांपासून सुरु  

By सिद्धेश जाधव | Published: June 24, 2022 11:10 AM2022-06-24T11:10:43+5:302022-06-24T11:11:27+5:30

POCO F4 5G स्मार्टफोन 12GB RAM, Qualcomm Snapdragon 870 आणि 67W sonic charging सह बाजारात आला आहे. .

12GB RAM Snapdragon 870 67W sonic charging featured POCO F4 5G launched in india   | वनप्लसशी पंगा घेण्यासाठी आला शक्तिशाली POCO F4 5G; किंमत 24 हजारांपासून सुरु  

वनप्लसशी पंगा घेण्यासाठी आला शक्तिशाली POCO F4 5G; किंमत 24 हजारांपासून सुरु  

Next

Xiaomi च्या सब-ब्रँड POCO नं कमी वेळात खूप जास्त लोकप्रियता कामवाली आहे. या ब्रँडच्या सी, एम, एक्स आणि एफ सीरिजच्या फोन्सना जास्त पसंती दिली जाते. आता कंपनीनं आपल्या एफ सीरिजचा विस्तार करत नवीन 5जी फोन POCO F4 5G सादर केला आहे. जो 12GB RAM, Qualcomm Snapdragon 870 आणि 67W sonic charging अशा शानदार फीचर्सना सपोर्ट करतो.  

POCO F4 5G चे स्पेसिफिकेशन्स 

पोको एफ4 5जी फोनमध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ ई4 अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन, 1300निट्स ब्राईटनेस, 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. POCO F4 5G स्मार्टफोनच्या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे.  

पोको एफ4 5जी अँड्रॉइड 12 आधारित मीयुआय 13 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा फ्लॅगशिप ग्रेड स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत एड्रेनो 650 जीपीयू आणि क्वॉलकॉम एक्स55 मॉडेम देण्यात आला आहे. फोनमध्ये 12 जीबी पर्यंत LPDDR5 RAM व 256 जीबी पर्यंतची UFS 3.1 Storage देण्यात आली आहे. टर्बो रॅम फिचरच्या मदतीनं 3GB पर्यंतचा व्हर्च्युअल रॅम वाढवता येतो.  

फोटोग्राफीसाठी पोको एफ4 5जी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 20 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी फोनमधील 4,500mAh ची बॅटरी 67W sonic charging टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे.  

POCO F4 5G ची किंमत 

POCO F4 5G स्मार्टफोनचा 6GB RAM व 128GB Storage असलेला मॉडेल 27,999 रुपयांमध्ये भारतात सादर करण्यात आला आहे. परंतु लाँच ऑफर अंतर्गत हा फोन 23,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. 8GB RAM व 128GB Storage मॉडेलची मूळ किंमत 29,999 रुपये आणि लाँच ऑफरमधील किंमत 25,999 रुपये आहे. 12GB RAM व 256GB Storage व्हेरिएंट लाँच ऑफर अंतर्गत 29,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल परंतु त्यानंतर 33,999 रुपये मोजावे लागतील. या फोनची विक्री 27 जूनपासून फ्लिपकार्टवर सुरु होईल. 

Web Title: 12GB RAM Snapdragon 870 67W sonic charging featured POCO F4 5G launched in india  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.