YouTube नंतर Meta ने देखील मोठी कारवाई करत 1 कोटी अकाउंट ब्लॉक केले आहेत. कंपनीने अशा अकाउंटवर कारवाई केली आहे, जे अन-ओरिजिनल, स्पॅम कंटेंट किंवा इतरांकडून कॉपी केलेले कंटेंट पोस्ट करत होते. इतकेच नाही तर, Meta ने अशा 5 लाख खात्यांवर दंडही ठोठावला आहे, जे बनावट एंगेजमेंट, रिपिटेटिव्ह पोस्ट आणि व्ह्यूज किंवा पैशासाठी सिस्टममध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न करत होते.
Meta आता डुप्लिकेट व्हिडिओ शोधण्यासाठी आणि ते हटवण्यासाठी अॅडव्हान्स डिटेक्शन टूल्सचा वापर करत आहे. याद्वारे ओरिजिनिल कंटेट क्रिएटर्सना त्यांचे श्रेय आणि रिच मिळेल. आता वारंवार कंटेट चोरी करणाऱ्या अकाउंट्सच्या रिचवरच रिणाम होणार नाही, तर अशा अकाउंट्सना Facebook मोनेटायझेशन प्रोग्रामद्वारे पैसे कमविण्याची संधी देखील मिळणार नाही.
Meta चा या लोकांना इशारा
Meta अशा लोकांना इशारा देत आहे, जे AI टूल्सवर जास्त अवलंबून असतात. कंपनीने त्यापैकी कोणाचेही नाव घेतले, नाही परंतु कमी प्रयत्नात कंटेंट तयार करणाऱ्या, निकृष्ट दर्जाच्या ऑटो-कॅप्शन वापरणाऱ्या आणि दुसऱ्याच्या कामावर वॉटरमार्क लावणाऱ्यांना इशारा दिला आहे. मेटाचे म्हणणे आहे की, कंपनी एका अशा फीचरची चाचणी करत आहे, जे युजर्सना रिपोस्ट केलेल्या व्हिडिओंद्वारे मूळ व्हिडिओशी जोडेल. कंपनीच्या या पावलामुळे स्पॅम कंटेंट किंवा इतरांचे काम चोरणाऱ्याना दणका बसेल.
मेटाचे म्हणणे आहे की, हे नवीन नियम हळूहळू लागू केले जातील, जेणेकरुन कंटेंट क्रिएटर्सना नवीन नियमांशी जुळवून घेण्यासाठी वेळ मिळेल.