Mumumbar Diana won two bronze, Croatia Jew The only Indian in the Tete competition | मुंबईकर दियाने जिंकले दोन कांस्य, क्रोएशिया ज्यु. टेटे स्पर्धेत एकमेव भारतीय
मुंबईकर दियाने जिंकले दोन कांस्य, क्रोएशिया ज्यु. टेटे स्पर्धेत एकमेव भारतीय

मुंबई : मुंबईकर दिया चितळे हिने क्रोएशिया ज्युनिअर आणि कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत दुस-या कांस्यपदकाची कमाई करताना आपल्या मोहिमेची यशस्वी सांगता केली. स्पर्धतील दुसरे कांस्य दियाने मुलींच्या कॅडेट गटात जिंकले.
क्रोएशियातील वाराजदीन येथे झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत भारताकडून सहभागी होणारी दिया एकमेव खेळाडू होती. उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात जगातील सातव्या क्रमांकावर असलेली आणि स्पर्धेत दुसरे मानांकन लाभलेल्या जपानच्या सातसुकी ओडोला ११-७, ३-११, ११-८, १२-१० असे नमवून खळबळजनक विजय मिळवला. या शानदार विजयासह दियाने कांस्य निश्चित केले होते. परंतु, रविवारी झालेल्या उपांत्य सामन्यात रशियाच्या तिसºया मानांकित आणि जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असलेल्या एलिझाबेथ अब्रामियनविरुद्ध दियाचा ११-६, ५-११, ९-११, ५-११ असा पराभव झाला.
याआधी दियाने मुलींच्या १५ वर्षांखालील सांघिक गटात रशियाच्या लियूबोव टेंटसरच्या साथीने खेळताना कांस्य जिंकले होते. (वृत्तसंस्था)
>माझ्या कामगिरीवर मी खूश आहे. चांगल्या स्थितीमध्ये असताना मी दोन सामने गमावले. पण ही स्पर्धा चांगली ठरली आणि यामुळे माझा आत्मविश्वास आणखी उंचावला आहे.
- दिया चितळे


Web Title: Mumumbar Diana won two bronze, Croatia Jew The only Indian in the Tete competition
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.