Paddler Bhavina Patel wins historic silver medal : भारताच्या भाविना पटेलची 'रौप्य' क्रांती!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 08:07 AM2021-08-29T08:07:59+5:302021-08-29T08:20:29+5:30

Paddler Bhavina Patel wins historic silver medal : तेरा वर्षांपूर्वी भाविनाने अहमदाबाद शहरातल्या वस्त्रापूर भागात टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली.

India's Bhavinaben Patel wins silver medal in women's singles class 4 table tennis event in Tokyo Paralympics | Paddler Bhavina Patel wins historic silver medal : भारताच्या भाविना पटेलची 'रौप्य' क्रांती!

Paddler Bhavina Patel wins historic silver medal : भारताच्या भाविना पटेलची 'रौप्य' क्रांती!

Next

टोकियोत सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची टेबलटेनिसपटू भाविना पटेल हिला Class 4 च्या अंतिम फेरीत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. Class 4 च्या अंतिम लढतीत भाविनाचा सामना चीनच्याच यिंग झोयूशी झाला आहे.  

आज झालेल्या Class 4 च्या अंतिम लढतीत भाविनाचा यिंग झोयूने पराभव केला. यावेळी चीनच्या यिंग झोयूने भाविनावर  3-0 (11-7, 11-5, 11-6 ) असा शानदार विजय मिळवला. दरम्यान, पॅरालिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिस खेळात अंतिम फेरी गाठणारी भाविना पहिलीच भारतीय खेळाडू आहे.

तेरा वर्षांपूर्वी भाविनाने अहमदाबाद शहरातल्या वस्त्रापूर भागात टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली. भाविना व्हीलचेअरवर बसून खेळते. बाराव्या वर्षी तिला पोलिओ असल्याचे स्पष्ट झाले. या आजाराने खचून न जाता भविनाने दमदार वाटचाल केली आहे. 

2011 मध्ये भाविनाने थायलंड इथे झालेल्या अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करत जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानी झेप घेतली होती. 2013मध्ये बीजिंगमध्ये झालेल्या आशियाई पॅरा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भाविनाने रौप्यपदक पटकावले होते.

भाविनाने जॉर्डन, तैवान, चीन, दक्षिण कोरिया, जर्मनी, इंडोनेशिया, स्लोव्हेनिया, थायलंड, स्पेन, नेदरलॅण्डस, इजिप्त येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने भाग घेतला, पदकं मिळवली. पण सुवर्ण पदक मात्र कायम तिला हुलकावणी देत राहिले.

(सलाम! टोकियो पॅरालिम्पिकमधे टेबल टेनिसच्या फायनलपर्यंत धडक मारणारी भविना पटेल; तिच्या अफाट जिद्दीची गोष्ट)

Web Title: India's Bhavinaben Patel wins silver medal in women's singles class 4 table tennis event in Tokyo Paralympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app
टॅग्स :Tennisटेनिस