जिल्हा परिषद सुरु करणार एलकेजी, युकेजी शाळा - सीईओ दिलीप स्वामी
By शीतलकुमार कांबळे | Updated: May 13, 2023 17:22 IST2023-05-13T17:21:11+5:302023-05-13T17:22:12+5:30
समग्र शिक्षा व स्टार्स प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी जिल्हा स्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा परिषद सुरु करणार एलकेजी, युकेजी शाळा - सीईओ दिलीप स्वामी
सोलापूर : जिल्हा परिषद प्रायोगिक तत्वावर एलकेजी, युकेजी शाळा सुरु करणार आहे. यासाठी जिल्ह्यातील 10 हजार लोकसंख्या असलेल्या गावांची निवड करण्यात येत असल्याचे सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
समग्र शिक्षा व स्टार्स प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी जिल्हा स्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या एक दिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सिईओ दिलीप स्वामी बोलत होते. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, शिक्षणाधिकारी संजय जावीर, डाएटचे प्राचार्य रामचंद्र कोरडे, शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, क्रांती कुलकर्णी, शशीकांत शिंदे, इब्राहिम नदाफ प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने लेट्स चेंज या उपक्रमात राज्यात तृतीय क्रमांक पटकाविला आहे. या उत्कृष्ठ कामाबद्दल शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संजय जावीर व विस्तार अधिकारी स्वाती स्वामी यांनी उत्कृष्ठ जिल्हा समन्वयक म्हणून काम केलेबद्दल सिईओ स्वामी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा, पटसंख्या टिकवून ठेवा, पटसंख्येसाठी चांगली गुणवत्ता असणे आवश्यक आहे. शिक्षण विभागाचे अस्तित्व पटसंख्येवर आहे. चांगली गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी दशसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी करा, असे आवाहन सीईओ दिलीप स्वामी यांनी केले