शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
4
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
5
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
6
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
7
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
8
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
9
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
12
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
13
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
14
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
15
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
16
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
17
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
18
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
20
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान

जकराया, लोकमंगलने केली सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांची कोंडी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 11:20 IST

‘जकराया’ शुगरने दिलेल्या पहिल्या उचलीचा बोलबाला जिल्हाभर सुरू असताना लोकमंगल सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बरोबरीने दर देणार असल्याचे शेतकºयांना सांगू लागले आहेत.

ठळक मुद्देपहिली उचल दोन हजार रुपये देण्याची भूमिका कारखानदारांनी घ्यावीकारखानदारांनी एफ.आर.पी. तर द्यावीच लागेल ही कायदेशीर बाब निदर्शनाला आणलीकोल्हापूरप्रमाणे एफ.आर.पी. अधिक दोनशे रुपयावर कारखानदार ठाम साखर कारखान्यांनीही पैसे जमा केले नसल्याने कारखानदार दराबाबत कोड्यात

अरुण बारसकरसोलापूर : ‘जकराया’ शुगरने दिलेल्या पहिल्या उचलीचा बोलबाला जिल्हाभर सुरू असताना लोकमंगल सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बरोबरीने दर देणार असल्याचे शेतकºयांना सांगू लागले आहेत. दराच्या प्रश्नावरुन कोंडीत सापडलेल्या ‘लोकमंगल’ने दराबाबत एक पाऊल पुढे टाकल्याने अन्य साखर कारखान्यांची          कोंडी झाली आहे.सालाबादप्रमाणे याहीवर्षी ऊस दराच्या प्रश्नावरुन आंदोलने झाली सर्वच शेतकरी संघटनांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या भंडारकवठे व बीबीदारफळच्या कारखान्यांना लक्ष्य केले.  सुरुवातीच्या बैठकीत पहिली उचल दोन हजार रुपये देण्याची भूमिका कारखानदारांनी घ्यावी असा मुद्दा पुढे आला. मात्र याच बैठकीत काही कारखानदारांनी एफ.आर.पी. तर द्यावीच लागेल ही कायदेशीर बाब निदर्शनाला आणली. प्रत्यक्ष साखर कारखाने सुरू झाल्यानंतर पुणे, अनगर व सोलापुरात दराबाबत बैठका झाल्या. पुण्याच्या बैठकीत कोल्हापूरप्रमाणे एफ.आर.पी. अधिक दोनशे रुपयावर कारखानदार ठाम राहिले. तोडगा न निघाल्याने संघटनांनी लोकमंगल भंडारकवठे व बीबीदारफळ कारखान्यासमोर आंदोलन केले. दोन्ही कारखाने संघटनांच्या आंदोलनानंतर बंद पडल्याने दराचा तोडगा काढण्यासाठीच्या हालचाली तीव्र झाल्या. दोन्ही कारखाने बंद पडलेल्या दिवशी अनगरच्या बैठकीत एफ.आर.पी. अधिक ३०० रुपये दर देण्यावर कारखानदारांचे एकमत झाले़ ही माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितली. संघटनेसमोर चर्चा करुन अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख व कारखान्याच्या वतीने जि.प. अध्यक्ष संजय शिंदे व माजी आ. दिलीप माने यांच्यावर सोपवली. त्यांनी संघटनांच्या पदाधिकाºयांशी केलेल्या चर्चेत तोडगा निघाला नाही. जिल्हाभरातील कारखाने सुरू असताना दरावरुन ‘लोकमंगल’चे दोन्ही कारखाने बंद आहेत अन् अन्य कारखानदारांनी दराची चर्चा थांबविल्याचे लोकमंगलच्या लक्षात आले. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे बंधू सतीश देशमुख, लोकमंगल शुगरचे चेअरमन महेश देशमुख व संचालक शहाजी पवार यांनी संघटनांनी स्वतंत्र चर्चा करुन एफ.आर.पी. अधिक ४०० रुपये जाहीर करुन कारखाने सुरू केले. जकराया शुगरने अगोदरच पहिली उचल २५०० रुपये जाहीर केली होती. आता ‘लोकमंगल’ साखर कारखान्याचे अधिकारी सिद्धेश्वरप्रमाणे दर देणार असल्याचे सांगून एक पाऊल पुढे टाकले आहे. अन्य साखर कारखान्यांनी मात्र दराबाबत  भूमिका उघड केली नाही.--------------------------सारेच कारखानदार कोड्यात- जकराया कारखान्याने जाहीर केल्याप्रमाणे पहिली उचल २५०० रुपये जमा केले असून, अन्य साखर कारखान्यांनी अद्याप ऊस उत्पादकांच्या खात्यावर पैसे जमा केले नाहीत. लोकमंगल साखर कारखान्याने एफ.आर.पी. अधिक ३०० रुपये देण्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात शेतकºयांच्या खात्यावर जमा पैसे जमा झाले नाहीत. अन्य साखर कारखान्यांनीही पैसे जमा केले नसल्याने कारखानदार दराबाबत कोड्यात पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने