मंगळवेढ्यात युवकाची आत्महत्या
By Admin | Updated: August 17, 2014 23:43 IST2014-08-17T23:43:37+5:302014-08-17T23:43:37+5:30
गळफास घेऊन आत्महत्त्या

मंगळवेढ्यात युवकाची आत्महत्या
मंगळवेढा : मंगळवेढा शहरातील एका १८ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. ही घटना शिवाजीनगर (मंगळवेढा) येथे घडली. आकाश बबन सावंत असे मयताचे नाव आहे. याबाबत पोलिसात नोंद झाली आहे.१६ आॅगस्ट रोजी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी आई-वडील देवदर्शनासाठी बाहेरगावी गेल्यानंतर अज्ञात कारणावरून छताच्या पंख्याला कापडाच्या सहाय्याने आकाश सावंत याने गळफास घेतला. याबाबत बापू गायकवाड यांनी पोलिसात खबर दिली. तपास पोलीस हवालदार दत्तात्रय तोंडले करीत आहेत.