अज्ञात वाहनाच्या धडकेत तरूणाचा मृत्यू
By रूपेश हेळवे | Updated: July 2, 2023 15:59 IST2023-07-02T15:59:06+5:302023-07-02T15:59:22+5:30
मृत सागर हा आपल्या दुचाकीवरून सोलापूर ते पुणे हायवेवर जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिली.

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरूणाचा मृत्यू
रूपेश हेळवे, सोलापूर : बाळे परिसरात दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने पाठीमागून ठोकरल्याने तरुणाचा मृत्यू झाला. सागर राजेंद्र कोरे ( वय २५, रा. कोंडी) असे त्या तरूणाचे नाव आहे. ही घटना रविवारी पहाटे उघडकीस आली.
मृत सागर हा आपल्या दुचाकीवरून सोलापूर ते पुणे हायवेवर जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात सागर हे गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेची माहिती फौजदार चावडी पोलिसांना कळताच हवालदार घुगे हे घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी लगेच सागर याला बेशूध्दावस्थेत उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.