युवक काँग्रेसने महापालिकेसमोर माठ फोडून ठोकली बोंब

By राकेश कदम | Updated: May 26, 2023 14:14 IST2023-05-26T14:13:43+5:302023-05-26T14:14:17+5:30

पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी : भाजप नेत्यांविरुध्द घोषणाबाजी

Youth Congress broke the ground and threw a bomb in front of the Municipal Corporation | युवक काँग्रेसने महापालिकेसमोर माठ फोडून ठोकली बोंब

युवक काँग्रेसने महापालिकेसमोर माठ फोडून ठोकली बोंब

 सोलापूर: शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी महापालिकेसमोर पाण्याचे रिकामे माठ फोडून बोंबाबोंब आंदोलन केले. शहरातील पाणी टंचाई दूर करण्याऐवजी भाजप नेते उद्घाटन कार्यक्रमात व्यस्त असल्याची टीका कार्यकर्त्यांनी केली.

भाजप नेते, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी विविध विकास कामांचे उद्घाटन झाले‌‌ होते. या कार्यक्रमाचा निषेध म्हणून शुक्रवारी आंदोलन केल्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी केली.

यावेळी प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर, प्रवीण जाधव, विश्वराज चाकोते, तिरुपती परकीपंडला, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, शरद गुमटे, महेंद्र शिंदे,संजय गायकवाड, दाऊद नदाफ, युवराज जाधव, समीर काझी, अशुतोष वाले,धीरज खंदारे, मनोहर चकोलेकर, अजिंक्य पाटील, चंद्रकांत नाईक, बबलू जाधव, यासीन शेख, शिवराज कोरे, किरण राठोड,ओंकार पवार, निखिल पवार, गणेश देवसानी,आकाश भोसले आदी उपस्थित होते.

Web Title: Youth Congress broke the ground and threw a bomb in front of the Municipal Corporation