गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
By दिपक दुपारगुडे | Updated: July 4, 2023 15:11 IST2023-07-04T15:10:48+5:302023-07-04T15:11:01+5:30
या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
सोलापूर : राहत्या घरात नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. फारूक रसूल शेख ( रा. विजय नगर, मदर इंडिया झोपडपट्टी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री उघडकीस आली.
मृत फारूक याने सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घरातील छताच्या लाकडी वाशाला गळफास घेतला. पण दोरी तुटून तो निळ्या ड्रमवर पडलेला आढळला. यामुळे नातेवाईकांनी याची माहिती लगेच सदर बाझार पोलिसांना दिली. माहिती मिळताच ए. पी. कंचे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने त्याला लगेच उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.