सहाजणांच्या मारहाणीत तरुणाचे बोट फ्रॅक्चर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:20 IST2021-02-08T04:20:09+5:302021-02-08T04:20:09+5:30

अमित चव्हाण, त्याची आई नंदाबाई गजेंद्र चव्हाण व वडील गजेंद्र चव्हाण हे शेतात उसाची लावणी करीत होते. यावेळी सामाईक ...

Young man's finger fractured in six beatings | सहाजणांच्या मारहाणीत तरुणाचे बोट फ्रॅक्चर

सहाजणांच्या मारहाणीत तरुणाचे बोट फ्रॅक्चर

अमित चव्हाण, त्याची आई नंदाबाई गजेंद्र चव्हाण व वडील गजेंद्र चव्हाण हे शेतात उसाची लावणी करीत होते. यावेळी सामाईक बांधावरील चिलारीच्या काटाड्या लागवडीस आडव्या येत असल्याने त्याचे शेंडे तोडले. हे पाहून धनाजी चव्हाण यांनी घरातील लोकांना तेथे बोलावून घेतले. यावेळी तुला त्या दिवशी काय सांगितले, ते समजले नाही का? असे म्हणून राहुल चव्हाण यांनी अमित चव्हाण याचे दोन्ही हात पकडले. यानंतर महावीर चव्हाण याने पाठीत बुक्क्याने मारहाण केली. त्यांच्या तो तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करीत असताना संगीता चव्हाण हिने त्याच्या डोळ्यात चटणी टाकली, तर धनाजी चव्हाण याने कोयता व लोखंडी राॅडने डाव्या हाताच्या बोटावर व दंडावर मारल्याने डावे बोट फ्रॅक्चर झाले. तेथून जाताना त्यांनी तू जर पोलिसांत गेला तर याद राख, अशी धमकी दिली. याबाबत अमित चव्हाण यांनी फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Young man's finger fractured in six beatings