भीमा नदीचा पात्रात तरुण वाहून गेला; भंडारकवठ्यातील दुर्दैवी  घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 05:28 PM2020-09-08T17:28:18+5:302020-09-08T17:28:22+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

The young man was carried away in the character of the river Bhima; The unfortunate incident in Bhandarkavatha | भीमा नदीचा पात्रात तरुण वाहून गेला; भंडारकवठ्यातील दुर्दैवी  घटना

भीमा नदीचा पात्रात तरुण वाहून गेला; भंडारकवठ्यातील दुर्दैवी  घटना

googlenewsNext

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील भीमा नदीच्या पात्रात तरुण वाहून गेला आहे. 

 
याबाबत  सविस्तर  माहिती  अशी की, मुत्तण्णा सणप्पा बिराजदार (वय- ३२) रा, भंडारकवठे  हा तरुण आज मंगळवार ८ रोजी सकाळी  ८.३० वाजण्याच्या सुमारास  भीमा नदीच्या पात्रातील विद्युत मोटार पाईप काढण्यासाठी  गेला होता. पाईप काढत असताना नदीच्या पात्रात अचानक जोरात पाण्याचा प्रवाह आल्याने मुत्तण्णा पाण्यात वाहून गेला आहे.

दरम्यान, पाण्यात  बेपत्ता झालेल्या मुत्तण्णाला शोधण्यासाठी गावातील काही तरुण दुथडी भरुन वाहणाऱ्या नदीच्या पात्रात शोध घेत आहेत. मुत्तण्णा नदीच्या  पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता होऊन काही तास झाले अद्याप ही त्याचा शोध लागला नाही.

Web Title: The young man was carried away in the character of the river Bhima; The unfortunate incident in Bhandarkavatha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.