साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

By दिपक दुपारगुडे | Updated: July 2, 2023 16:21 IST2023-07-02T16:21:23+5:302023-07-02T16:21:54+5:30

ही घटना शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली.

young man hanging himself with a saree | साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

दीपक दुपारगुडे, सोलापूर : राहत्या घरात पत्र्याच्या खोलीत वाश्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. सुरज गायकवाड ( वय २२, रा. हनुमान नगर, भवानी पेठ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली.

मृत सुरज याने राहत्या घरातील पत्र्याच्या शेडमधील खोलीतील वाश्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतले. त्याला लगेच खाली उतरवून उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

Web Title: young man hanging himself with a saree