आर्थिक संकटातील तरुणाने कुटुंबाला संपवले, स्वत: केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:23 IST2021-05-11T04:23:27+5:302021-05-11T04:23:27+5:30
बक्षी हिप्परगे (ता. दक्षिण सोलापूर) येथील हणमंत द-याप्पा शिंदे (वय ४०) हा गेल्या अनेक वर्षांपासून लोणी काळभोर नजीक कदम ...

आर्थिक संकटातील तरुणाने कुटुंबाला संपवले, स्वत: केली आत्महत्या
बक्षी हिप्परगे (ता. दक्षिण सोलापूर) येथील हणमंत द-याप्पा शिंदे (वय ४०) हा गेल्या अनेक वर्षांपासून लोणी काळभोर नजीक कदम वस्ती येथे कुटुंबासह राहतो. बदली चालक म्हणून तो काम करतो. लॉकडॉऊनमुळे वर्षभरात त्याला काम मिळाले नाही. कर्जाचा डोंगर वाढत गेला. तीन मुले आणि पत्नी यांचा सांभाळ करणे अडचणीचे झाले. त्यातून पती-पत्नीचे रोज वाद होत राहिले. रविवारी वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्याने सकाळी झोपलेल्या पत्नी प्रज्ञा (वय २८) हिच्या गळ्यावर उशी दाबल्याने गुदमरून तिचा मृत्यू झाला. जवळच १४ महिन्याचे बाळ खेळत होते. त्याचा सुरीने गळा कापला. त्यानंतर बाथरूममध्ये जाऊन दोरीने गळफास घेऊन स्वत: आत्महत्या केली. दोन मोठी मुले घराबाहेर खेळत असल्याने ती मात्र वाचली. लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन तिघांचे प्रेत ताब्यात घेतले. रात्री उशिराने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.