पेट्रोल आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा जळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 02:49 AM2019-12-31T02:49:13+5:302019-12-31T02:49:17+5:30

सोलापूर : पेट्रोल आणण्यासाठी गेलल्या तरूणाचा होटगी-एनटीपीसी रोडवरील होटगी गावच्या शिवारात जळून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. वळसंग पोलीस ठाण्यात ...

Young man burnt to death for petrol | पेट्रोल आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा जळून मृत्यू

पेट्रोल आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा जळून मृत्यू

googlenewsNext

सोलापूर : पेट्रोल आणण्यासाठी गेलल्या तरूणाचा होटगी-एनटीपीसी रोडवरील होटगी गावच्या शिवारात जळून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. वळसंग पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, हा खून की आत्महत्या याचा तपास सुरू आहे. सकाळी सातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

नरेश श्रीहरी चिलगानी (२७ रा. नवीन विडी घरकूल) असे मयताचे नाव आहे. नरेश हा सकाळी ६ वाजता झोपेतून उठला. त्याने वडिलांच्या गाडीतील पेट्रोल काढले व स्वत:च्या मोटरसायकलमध्ये घातले. नंतर बाटली घेऊन तो आईला पेट्रोल आणण्यासाठी जातो असे सांगून घरातून निघून गेला.

बराच वेळ झाला तरी तो परत आलाच नाही. होटगी गावच्या शिवारातील रोडलगत असलेल्या सोमनाथ रामप्पा माळी यांच्या शेतात त्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. रस्त्याने जाणाऱ्या येणाºया लोकांच्या लक्षात आले, तेव्हां वळसंग पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता, रोडलगत नरेश चिलगानी याची मोटरसायकल उभी होती. रस्त्याच्या खाली असलेल्या शेतात त्याचा मृतदेह दिसून आला.

दोन महिन्यांनंतर होणार होते लग्न
नरेश हा एका दुकानात टेलरचे काम करीत होता. आई घरात विड्या वळण्याचे काम करते. काही दिवसापूर्वीच त्याचा साखरपुडा झाला होता.

Web Title: Young man burnt to death for petrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.