पोलिसांना वाळूच्या गाडीचे लोकेशन देतो म्हणून तिघांकडून तरुणास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:17 IST2021-07-20T04:17:03+5:302021-07-20T04:17:03+5:30

मदने यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ‘शुक्रवारी (दि. १६) साडेसात वाजताच्या सुमारास घरी असताना मुन्ना हनुमंत दैन याचा फोन ...

Young man beaten by three as he gives the location of the sand truck to the police | पोलिसांना वाळूच्या गाडीचे लोकेशन देतो म्हणून तिघांकडून तरुणास मारहाण

पोलिसांना वाळूच्या गाडीचे लोकेशन देतो म्हणून तिघांकडून तरुणास मारहाण

मदने यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ‘शुक्रवारी (दि. १६) साडेसात वाजताच्या सुमारास घरी असताना मुन्ना हनुमंत दैन याचा फोन आला. ‘तू बायपास येथे ये, मला तुझ्याशी बोलायचे आहे’, असे म्हटल्याने बायपास येथे आलो. त्यानंतर त्याने मला सोबतच्या गाडीत बसण्यास सांगितले. यानंतर ‘तू पोलिसांना वाळूच्या गाडीचे लोकेशन देतो. ते खरे-खोटे करायचे आहे. त्यासाठी माझा भाऊ आबा वांगी नं. १ कडे जाणाऱ्या रोडवर थांबला आहे’, असे सांगून आपल्याला वांगी नंबर १ कडे जाणाऱ्या रोडवर घेऊन आला. तेथे त्याचा भाऊ आबा, मुन्ना दैन यांनी गाडीतील बेसबाॅल स्टिकने मारले. त्यानंतर सोबत असलेल्या इतर एकाने पायाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. त्यानंतर तेथून ते शिवीगाळ करून निघून गेले. त्यानंतर मित्र सुहास तावरे याला ही घटना सांगितल्याने तो त्या ठिकाणी आला. त्याने रुग्णालयात दाखल केले. यात मुन्ना हनुमंत दैन, भाऊ आबा व आणखी एकावर तक्रार असल्याचे मदने यांनी म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा नोंदला आहे.

Web Title: Young man beaten by three as he gives the location of the sand truck to the police