कर्जबाजारपणाला कंटाळून सोलापूर जिल्ह्यातील एका तरूण शेतकºयाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 13:22 IST2017-12-08T13:20:31+5:302017-12-08T13:22:04+5:30
मागील काही वर्षापासून राज्यातील शेतकºयांच्या आत्महत्येच्या घटना वारंवार घडत आहेत़

कर्जबाजारपणाला कंटाळून सोलापूर जिल्ह्यातील एका तरूण शेतकºयाची आत्महत्या
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ७ : मागील काही वर्षापासून राज्यातील शेतकºयांच्या आत्महत्येच्या घटना वारंवार घडत आहेत़ शुक्रवार ७ डिसेंबर २०१७ रोजी कर्जबाजारपणाला कंटाळून सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असलेल्या मोडनिंब येथील एका तरूण शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली़
सचिन बबन गिड्डे (वय ३८ रा़ मोडनिंब ता़ माढा) असे मृत तरूण शेतकºयाचे नाव आहे़ सातत्याने अवकाळी पाऊस, दुष्काळामुळे शेतीच्या उत्पादनात झालेली घट यामुळे खासगी सावकाराचे कर्ज दिवसेंदिवस वाढत होते़ शिवाय खासगी सावकाराने पैशाच्या मागणीसाठी लावलेला तगादा यामुळे मोडनिंबच्या शेतकºयावर आत्महत्या करण्याची वेळ आली़ मृत सचिन गिड्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे़ नापिक व खासगी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे़