टाकीवरून उडी घेऊन इसमाची आत्महत्या
By Admin | Updated: August 17, 2014 23:41 IST2014-08-17T23:41:03+5:302014-08-17T23:41:03+5:30
शहा नगरात हा प्रकार

टाकीवरून उडी घेऊन इसमाची आत्महत्या
सोलापूर : पाण्याच्या टाकीवरून उडी घेऊन गजानन शंकर चव्हाण (वय ४५, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी क्रमांक-१, सोलापूर) याने आत्महत्या केली. आज (रविवारी) दुपारी ३ वाजता त्याने शहा नगरात हा प्रकार केला.
गजानन याला घरगुती टेन्शन होते. त्या टेन्शनमध्ये त्याने शिंदी प्राशन केले आणि शहा नगरातील आंबेडकर हायस्कूलजवळील पाण्याच्या टाकीवर चढला. तेथून त्याने उडी घेतली. मामा महेश मुरलीधर काळे याने त्याला तातडीने उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सिव्हिल चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.