शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

राजू अन् हिनाचा संसार रमणार नव्या पिंजºयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 2:32 PM

सोलापुरातील महात्मा गांधी प्राणिसंग्रहालय;  आठवडाभरात बिबट्यांच्या जोडीचे स्थलांतर; सहा वर्षांनंतर नर-मादी पहिल्यांदा एकत्र

ठळक मुद्देफेब्रुवारी २0१५ मध्ये हे चार पाहुणे उत्तर प्रदेशातील लखनौ येथील प्राणिसंग्रहालयातून शहरात दाखल झाले बिबट्यांची ही पिल्ले मागील पाच वर्षांपासून वातावरणाशी एकरूप होत इथल्या मातीत रुजलीदीड ते दोन वर्षांचे असलेल्या या बिबट्यांमध्ये सर्वात मोठा बलराम हा आज आठ वर्षांचा झाला आहे

यशवंत सादूल 

सोलापूर : मागील पाच वर्षांपासून महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयात वास्तव्यास असलेल्या चारपैकी दोन बिबट्यांची येत्या आठवड्यात विस्तीर्ण अशा नवीन पिंजºयात स्थलांतर होणार आहे . आपल्या अल्लड अदाकारीने सर्वांनाच लळा लावलेल्या हिना अन् शांत, संयमी राजू ही जोडी नव्या जागेत नवा संसार थाटणार आहे . प्रशस्त अशा जागेत नैसर्गिक वातावरणाची निर्मिती करण्यात आली आहे .

खास गुहा,त्यांना उड्या मारता येईल, लोळता येईल असे नैसर्गिक गवत, सहज चढउतार करता येईल व उन्हाळ्यातील थंडावा मिळेल, अशी कडूलिंबाची झाडे , त्यासोबत पाण्यात मनसोक्तपणे जलक्रीडा करण्यासाठी हौद अशी रचना पिंजºयात आहे . लोकांना बिबट्यांची हालचाल सहज नजरेस पडावी अशी सुटसुटीत रचना या नव्या पिंजºयाची आहे . सुरक्षिततेसाठी लोखंडी जाळी व सळई असे दुहेरी आवरणसुद्धा आहे ़ मागील चार ते पाच वर्षांपासून महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयातील सेवकांसह सर्वांना लळा लावणाºया बलराम, हिना, राजू, जिमी या बिबट्यांची लवकरच विस्तीर्ण अशा मोठ्या पिंजºयात स्थलांतर होणार आहे . केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने दिलेल्या निधीमुळे या पिंजºयाची निर्मिती झाली आहे.

फेब्रुवारी २0१५ मध्ये हे चार पाहुणे उत्तर प्रदेशातील लखनौ येथील प्राणिसंग्रहालयातून शहरात दाखल झाले आहेत. बिबट्यांची ही पिल्ले मागील पाच वर्षांपासून वातावरणाशी एकरूप होत इथल्या मातीत रुजली .दीड ते दोन वर्षांचे असलेल्या या बिबट्यांमध्ये सर्वात मोठा बलराम हा आज आठ वर्षांचा झाला आहे .बिबट्यांना साधारणत: अडीच ते तीन वर्षांपासून प्रौढत्व येते. चारही बिबटे हे प्रजननासाठी सक्षम आहेत . आजतागायत त्यांना वेगवेगळ्या पिंजºयात ठेवण्यात आले आहे .वाढत्या वयानुसार त्यांच्या हालचाली लक्षात घेऊन त्यांचे मोठ्या पिंजºयात स्थलांतर करीत नैसर्गिक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे काळजीवाहक भरत शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

या बिबट्यांना सहा वर्षांनंतर पहिल्यांदाच एकत्र सोडण्यात येणार आहे . चारही बिबट्यांना एकत्र सोडले तर जोखमीचे आहे .यातील बलराम हा जास्त आक्रमक असून, मादीसमोर आपले वर्चस्व दाखविण्याच्या प्रयत्नातून त्यांचे आपापसात भांडणे होऊन ते जखमी होतील. हा धोका टाळण्यासाठी शांत व संयमी राजू आणि अल्लड असलेली हिना ही जोडी पहिल्यांदा नव्या पिंजºयात सोडण्यात येणार आहे . दीड -दोन महिन्यांनंतर ही जोडी रुळली की बलराम आणि जिमी या जोडीला थोडे दिवस सोडण्यात येणार आहे . त्यांच्यात कोणतीही भांडणे न होता ते गुण्यागोविंदाने राहत आहेत याची खात्री पटली की चारही बिबटे एकत्र सोडण्यात येणार आहेत .

कमी उंचीच्या प्राण्यांची शिकार करण्याच्या सवयीतून माणसांवर हल्ला- बिबट्या हा निशाचर प्राणी असून, रात्री जास्त चपळ असतो . दबा धरून सावज टिपण्यात पटाईत असलेला हा प्राणी आपल्यापेक्षा कमी उंचीच्या मांसभक्षी प्राणी,कुत्री,हरीण,डुक्कर,कृतंक यांची शिकार करतो . त्यामुळेच काही वेळा उघड्यावर शौचास बसलेल्या माणसांवरही हल्ला करतो .त्यातून शौचालयाचा वापर करणे आवश्यक असल्याचे किती महत्त्वाचे आहे हे कळते .भारतासह आफ्रिका, दक्षिण आशियाई देशात आढळणाºया या प्राण्याची लांबी ४० ते ७५ इंच तर वजन साधारणत: ३० ते ९० किलो असते .जंगल,हिरवळ,पर्वतरांगा हे त्याचे वसतिस्थाने आहेत .त्याच्या पळण्याचा वेग ताशी ४० ते ४५ किलोमीटर इतका असते . अचानक समोर बिबट्या आलातर कोणतीही हालचाल न करता स्तब्ध एका ठिकाणी राहणे सुरक्षित असते, असे प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. नितीन गोटे यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका