शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा...! ८ दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
2
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
3
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
4
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
5
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
6
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
7
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
8
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
9
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
10
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
11
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं
12
जेपी इन्फ्राटेकचे एमडी मनोज गौर यांना अटक; १२,००० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आहे आरोप
13
डॉलरसमोर रुपयाची मोठी घसरण! तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बाजारात काय स्थिती?
14
Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
15
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
16
विसरभोळे प्रवासी! ‘इतक्या’ कोटींच्या वस्तू रेल्वेत विसरले, रोज घेता येईल मोठी कार; पाहा, आकडा
17
Court: भटक्या कुत्र्यांमुळे संसारात विघ्न; पत्नीच्या एका सवयीमुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज, नेमकं प्रकरण काय? 
18
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
19
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
20
Bhagvadgeeta: कोणतेही काम एका झटक्यात पूर्ण व्हावे, यासाठी 'हा' श्लोक २१ वेळा म्हणा!

World Cancer Day - चिमुकल्या धवलचा मृत्यू चटका लावणारा पण...आई-बाबांना कॅन्सरविरोधी आरोग्यदूत बनविणारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 10:56 IST

काशिनाथ वाघमारे सोलापूर : अवघा चार वर्षाचा धवल...हसता, खेळता. घर अगदी गोकूळच; पण अचानक धवलला रक्ताचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न ...

ठळक मुद्देकॅन्सरग्रस्त मुलांसाठी धडपडणाºया पिस्के दाम्पत्याची कहाणीसात वर्षांत ४० हजार विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती‘४ फेब्रुवारी : जागतिक कर्करोग दिना’च्या पार्श्वभूमीवर पिस्के दाम्पत्याने ‘लोकमत’शी संवाद

काशिनाथ वाघमारे

सोलापूर : अवघा चार वर्षाचा धवल...हसता, खेळता. घर अगदी गोकूळच; पण अचानक धवलला रक्ताचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या आई - बाबांच्या पायाखालची जमीनच घसरली!... अखेर धवल गेला. त्याच्या मृत्यूने पिस्के कुटुंबाला काही काळासाठी उद्ध्वस्त केले; पण कालांतराने धवलचे आई - बाबा वनिता आणि विक्रम सावरले अन् त्यांनी कॅन्सरविरोधी आरोग्यदूत म्हणून काम करण्यास प्रारंभ केला.

वनिता आणि विक्रम पिस्के असे कॅन्सरग्रस्त मुलांसाठी धडपडणाºया दाम्पत्याचे नाव़ ‘४ फेब्रुवारी : जागतिक कर्करोग दिना’च्या पार्श्वभूमीवर पिस्के दाम्पत्याने ‘लोकमत’शी संवाद साधला. सत्तर फूट परिसरात कपड्यांचा व्यवसाय सांभाळून दिवसभरातील काही वेळ, कधी-कधी रात्रीचा वेळ कर्करोगग्रस्त मुलांसाठी खर्ची करणाºया विक्रम यांना मुलाच्या आजाराबाबत पुसटही कल्पना नव्हती़ आजार निष्पन्न होताच त्याला वाचवण्यासाठी २८ दिवसांत केलेली धडपड त्यांना साथ देणारी ठरली नाही़ मुलगा धवल याच्या शरीरात ताप अचानक वाढत गेला़ भोळ्या-भाबड्या माता-पित्यांनी त्याच्यासाठी जीवाचे रान केले़ अनेक वैद्यकीय उपचारही झाले़ कोणत्याच औषधाला गुण येत नव्हता़ अखेर काळाने त्याला कुटुंबापासून हिरावून घेतले़ या दाम्पत्याने त्याच्यासाठी खूप मोठी स्वप्नंही रंगवली होती़ त्याचं जाणं हे साºयांनाच चटका लावणारा ठरला खरा, पण इतरांसाठी लढण्याची प्रेरणा देऊन गेला़ 

अचूक उपचारासाठी विक्रमची धडपड- बºयाचदा रक्ताचा कर्करोग वा अन्य प्रकारचा कर्करोग जडला की पालक घाबरुन जातात़ कोणाची उपचारप्रणाली योग्य आणि अयोग्य, कोणते तज्ज्ञ विश्वासू, कोणाचा खर्च किती? अशा अनेक प्रश्नांनी गोंधळलेल्या पालकांना सावरण्यासाठी आणि त्यांना योग्य उपचार मिळावेत, शासनाची मदत मिळवून देण्यासाठी विक्रम पिस्के पुढे येतात़ काही वेळा डॉक्टर आणि पालक यांच्यामध्ये ते समन्वयाचीही भूमिका बजावतात़ दानशुरांच्या मदतीने ग्रामीण पालकांना मदत मिळवून देण्यासाठी त्यांची धडपड असते़ शेवटच्या टप्प्यात परिहार सेवा देण्याचा प्रयत्न पिस्के करतात.

सात वर्षांत ४० हजार विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती- ३ फेब्रुवारी २०११ हा दिवस आठवला की विक्रम आणि वनिता पिस्के दाम्पत्याच्या भावना अन् कं ठ दाठून येतो़ आजही आठवणीने त्यांचे डोळे पाणावतात़ धवलच्या आठवणीशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही़ ही आठवण त्यांना स्वस्त बसू देत नाही़ दिवसभरात कोणत्या ना कोणत्या कर्करुग्णाचा फोन येतोच़ कोणी ना कोणी घरी फिरकतोच़ ‘धवलायन फाउंडेशन’च्या माध्यमातून इतरांना कॅन्सरमधून बाहेर काढण्यासाठी रुग्णालय, दानशूर यांच्या पायºया झिजवण्यात वेळ जातो़ यातून कोणाला वाचवता आले तर तो दिवस सार्थकी लागल्याचे या दाम्पत्याला वाटते़ धवलच्या जाण्याला आठ वर्षे लोटून गेली, परंतु क र्करोगाविषयी जनजागृतीच्या कार्यात खंड पडू दिला नाही़ सात वर्षांत जवळपास ४० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पिस्के दाम्पत्य पोहोचले आहे़

बºयाचदा मुलांना ताप आला की पालक किरकोळ समजून जातात़ असा समज आम्हाला चटका लावणारा ठरला़ बहुतांश पालकांना या आजाराची नेमकी लक्षणे माहीत नाहीत़ वैद्यकीय क्षेत्रात हे शहर मेडिकल हब ठरत असले तरी पालकांमध्ये या आजाराबाबत फारशी जनजागृती नाही़ आजमितीला आमच्याकडे चार मुले कर्करोगाने जडलेली आहेत़ आर्थिक समस्येच्या गर्तेत सापडलेल्या मुलांना सोडवण्याचा प्रयत्न आहे़ परंतु दातृत्वाचे हात पुढे येईनात़ - विक्रम पिस्के, धवलायन फाउंडेशन

टॅग्स :Solapurसोलापूरcancerकर्करोगHealthआरोग्यMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटल