शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

देशाची घटना बदलण्याचे काम नरेंद्र मोदी सरकारकडून सुरू : सुशीलकुमार शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 11:59 IST

२०१४ साली माझ्याबरोबरच देशाची फसगत झाली. थापांना बळी पडून लोकांनी भाजप सरकार सत्तेवर आणले खरे, पण सगळ्यांचाच भ्रमनिरास झाला - सुशीलकुमार शिंदे

ठळक मुद्देअनगर येथे मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावाआता जातीवर, धर्मावर का विकासाला मत द्यायचे याचा निर्णय जनतेने केला पाहिजे - राजन पाटीलआज भारतातील निवडणुकीची गणिते बदलली आहेत. समाजात दुही निर्माण करण्याचे काम सुरू - राजन पाटील

अनगर : २०१४ साली माझ्याबरोबरच देशाची फसगत झाली. थापांना बळी पडून लोकांनी भाजप सरकार सत्तेवर आणले खरे, पण सगळ्यांचाच भ्रमनिरास झाला. शेतकºयांना योग्य दाम सरकार देऊ शकले नाही. युवा वर्गाला सरकार नोकºया देऊ शकले नाही. घटना बदलण्याचे काम हे सरकार करत आहे. या थापेबाज सरकारने नोटाबंदी, पुलवामा या घटनेवर राजकारण करणारे हे सरकार हुकूमशाहीचे आहे. अशा सरकारला आपण निवडून देणार की, लोकशाहीला हे ठरवण्याची वेळ आज आलेली आहे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री तथा सोलापूर लोकसभेचे काँग्रेस-राष्टÑवादीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

अनगर येथे मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास माजी आमदार राजन पाटील, आ.प्रणिती शिंदे, झेडपी सदस्य बाळराजे पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा  पाटील, उमेश पाटील, मानाजी माने, महेश पवार, देवानंद गुंड, प्रकाश पाटील, विश्वासराव कचरे उपस्थित होते.

बाळराजे पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास दिलीप कोल्हे, चेतन नरोटे , जाफरताज पटेल, डॉ. कौशिक गायकवाड , शहाजहान शेख , ब्रह्मदेव भोसले , नागनाथ सोनवणे यांच्यासह राष्टÑवादी-काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

निवडणुकीची गणिते बदलली : राजन पाटील- आज भारतातील निवडणुकीची गणिते बदलली आहेत. समाजात दुही निर्माण करण्याचे काम सुरू आहे. हाच आधार घेत निवडणुका लढल्या जात आहेत तर दुसºया बाजूला देशावर जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा तेव्हा तत्परतेने पुढे येऊन संकटाला दोन हात करीत देशाचा विकास केला. आता जातीवर, धर्मावर का विकासाला मत द्यायचे याचा निर्णय जनतेने केला पाहिजे, असे राजन पाटील म्हणाले.

टॅग्स :Solapurसोलापूरsolapur-pcसोलापूरmadha-pcमाधाSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाElectionनिवडणूक