Women's Day Special: Two hundred kilograms of bullet rides, the young woman of Solapur! | Women's Day Special :दोनशे किलोची बुलेट लिलया पेलून स्वार होतात सोलापूरच्या युवती !
Women's Day Special :दोनशे किलोची बुलेट लिलया पेलून स्वार होतात सोलापूरच्या युवती !

ठळक मुद्देदोनशे किलोपर्यंत वजन असलेली ही गाडी चालविण्यासाठी तशी धष्टपुष्ट शरीरयष्टी असावी लागतेभारतीय जनमानसाचा विचार करून कंपनीने १९९४ मध्ये त्यामध्ये काही तांत्रिक बदल करून सर्वांना चालविण्याजोगे सोपे केले

यशवंत सादूल 

सोलापूर : ‘जब बुलेट चले रस्ते पर, तो दुनिया रास्ता दे’... या उक्तीप्रमाणे प्रत्येक भारतीयाचे आकर्षण असलेली ही मोटरसायकल आयुष्यात एकदा तरी चालवावी, असे स्वप्न प्रत्यकाचे असते.

दोनशे किलोपर्यंत वजन असलेली ही गाडी चालविण्यासाठी तशी धष्टपुष्ट शरीरयष्टी असावी लागते, पण भारतीय जनमानसाचा विचार करून कंपनीने १९९४ मध्ये त्यामध्ये काही तांत्रिक बदल करून सर्वांना चालविण्याजोगे सोपे केले. त्यामुळे युवतींमध्येही बुलेटचे आकर्षण वाढत गेले. पुरुषांच्या बरोबरीने आपणही वजनाने जड असलेली ही गाडी चालवू शकतो, हे सरावाने सिद्ध केले ते सोलापुरातील लेडी सावरीन रायडर ग्रुप व शिवसम्राज्ञी प्रतिष्ठानच्या १५ ते २० युवतींनी. महिला दिनानिमित्त घेतलेला हा परामर्श.

शेतकºयांपासून ते सैनिक, पोलीस अधिकारी, राजकारणी अशा सर्व स्तरातील लोकांचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलून दिसते ते या राजेशाही गाडीमुळे. ‘रंगदार, थानेदार, बागाईतदार’ तीन दारात तर याचे मोठे आकर्षण अन् प्रतिष्ठाही. महिला पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत. त्यांची बौद्धिक क्षमता अफाट असून, ती वेळोवेळी ते सिद्ध करूनही दाखवत आहेत. कुस्ती, मुष्टियुद्ध, वेटलिफ्टिंग अशा शारीरिक कष्टाच्या खेळातूनही नैपुण्य मिळवत आहेत. सोलापुरातील वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करणाºया दिव्या कदम, अस्मिता पवार, मंजुश्री सासवे, गौतमी राजूल, ऋतु भोसले, त्रिवेणी मोगल, पूजा चव्हाण अशा मेकॅनिक, संगणकीय, अभियांत्रिकी उच्च शिक्षित युवतींनी अवजड अशी बुलेट चालविण्याचा छंद जोपासला आहे. या गाडीवर स्वार होत भारतभर भटकंती करण्याची इच्छा आहे.

सैराटनंतर बुलेटचे आकर्षण युवतींमध्ये वाढले असले तरी मागील आठ ते दहा वर्षांपासून या युवतींनी वाहन चालविण्यासोबत बुलेट रायडर्स ग्रुप स्थापन केला आहे. या ग्रुपमार्फत शहरालगतचे पीकनिक स्पॉट, जवळपास असलेल्या तुळजापूर, रामलिंग, अक्कलकोट, उजनी धरण या ठिकाणी राईड करतात.

अशी आहे बुलेट ...
- १९५२ पासून संपूर्णत: भारतीय बनावटीची असलेली ही मोटरसायकल सर्वांत जास्त वजनाची आहे. त्याची लांबी पाच ते सहा फूट आहे. ३५० ते ६५० सीसी इंजिन क्षमतेच्या गाड्या उपलब्ध आहेत़ महिलांना थंडर बर्डसारख्या मॉडेलचे आकर्षण असून, त्या सहज चालवू शकतील अशी रचना आहे, असे पवन मोंढे यांनी सांगितले.

Web Title: Women's Day Special: Two hundred kilograms of bullet rides, the young woman of Solapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.