शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

Women's Day Special : भल्या पहाटे वर्तमानपत्र वाटून ‘ती’ घडवितेय स्वत:चं भविष्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 11:11 IST

गोपालकृष्ण मांडवकर  सोलापूर : शहर पहाटेच्या साखरझोपेत असते तेव्हा ‘तिच्या’ दिवसाला सुरुवात होते. भल्या पहाटे चार वाजता सायकल दामटत ...

ठळक मुद्देसोलापुरातील संगमेश्वर महाविद्यालयात शिकणाºया या धाडसी तरुणीशी संवाद साधला तेव्हा तिच्यातील जिद्दीचे दर्शन झालेमहिलांच्या दृष्टीने हे क्षेत्र तसे आडवळणाचेच, मात्र ती या क्षेत्राकडे वळण्यामागे आजोबांवरील प्रेमाची भावना आहे

गोपालकृष्ण मांडवकर 

सोलापूर : शहर पहाटेच्या साखरझोपेत असते तेव्हा ‘तिच्या’ दिवसाला सुरुवात होते. भल्या पहाटे चार वाजता सायकल दामटत ‘ती’ सोलापूरच्या आसरा चौकातील पेपर स्टॉलवर जाते. मुख्य एजंटाकडून दैनिकांचे अंक घेऊन स्टॉल मांडते. पहाटे फिरायला येणाºया ग्राहकांना स्टॉलवरून पेपर देते. साडेचार वाजता ती लाईनवर पेपर टाकायला निघते. शहरातील अंधारलेल्या गल्लीबोळातून बिनधास्त सायकल चालवत ती दारोदार अंक टाकत राहते. तिच्या या कामाचे कौतुक पाहण्यासाठी सूर्य रोज डोंगराआडून हळूच उगवतो; त्याच्या उगवण्यासोबत अंधार भेदतो अन् त्याच्या पहाटकिरणांनी ती वर्तमानपत्र वाटून घडवितेय स्वत:चे भविष्य !

सुश्मिता सटवाजी गायकवाड असे तिचे नाव. वय २४ वर्षे. शिक्षण एम.ए. मानसशास्त्र अंतिम वर्ष. सहसा या वयात कुणी तरुणी पहाटेच्या अंधारात एकटीच सायकलवरून फिरून पेपर लाईन टाकण्याचे काम करीत नाही, मात्र सुश्मिता अपवाद आहे. मागील १३ वर्षांपासून ती हे काम करते. सोलापुरातील संगमेश्वर महाविद्यालयात शिकणाºया या धाडसी तरुणीशी संवाद साधला तेव्हा तिच्यातील जिद्दीचे दर्शन झाले. महिलांच्या दृष्टीने हे क्षेत्र तसे आडवळणाचेच, मात्र ती या क्षेत्राकडे वळण्यामागे आजोबांवरील प्रेमाची भावना आहे. तिच्या आजोबांना पेपर वाचनाची भारीच हौस. ते वारल्यावर वडील सटवाजी गायकवाड यांनी वडिलांच्या आठवणीखातर एखाद्या वृद्ध वाचकाला आपल्याकडून एक वृत्तपत्र देण्याची कल्पना मांडली.

त्यावर सुश्मिता आणि तिच्या भावंडांनी अशी व्यक्ती स्वत:च शोधण्याची जबाबदारी घेतली. त्यातून वडिलांनी आसरा चौकातील बस शेडच्या एका कोपºयात मुलांसाठी पेपर स्टॉल सुरू करून दिला. पहिल्या दिवशी सकाळी २० अंक त्यांनी विक्रीसाठी ठेवले. दुपारी १२ वाजेपर्यंत वाट पाहिल्यावर मोजून सहा अंक विक्रीस गेले, तरीही पहिल्या दिवसाच्या विक्रीचा आनंद अवर्णनीय होता. आज ती दररोज एक हजारांच्या जवळपास अंक विकते. २०० अंकांची लाईन स्वत: टाकते. सकाळी ७ वाजेपर्यंत वाटपाचे काम झाले की स्टॉलवर बसून हिशेब करते. येणाºया ग्राहकांना अंक देते. सकाळी ११ वाजेपर्यंत हा स्टॉल सांभाळून घरी जाते. कॉलेजची कामे करते, पुन्हा दुपारी साडेतीन वाजल्यानंतर सवडीप्रमाणे स्टॉलवर येऊन राहिलेले काम पूर्ण करते. 

तिच्या या कामाचा मित्र आणि नातेवाईकांना अभिमान आहे. एक कर्तृत्ववान तरुणी म्हणून तिच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. मैत्रिणींमध्येही तिच्या कामाचा आदर आहे. या कामात तिला कधीच स्त्रीत्व आड आले नाही. क्षेत्र लहान असो की मोठे, त्यातून स्वत:ला कसे घडवायचे हे एकदा उमगले की सर्व वाटा सुलभ होतात, असा तिचा स्वानुभव आहे. 

व्यवसायाने दिशा दिलीहा व्यवसाय कधी अडचणीचा वाटला नाही का, या प्रश्नावर तिचे उत्तर साफ नकारार्थी आहे. या व्यवसायाने आपल्यासह बहिणीच्या आणि भावाच्या आयुष्याला दिशा दिली, असे तिचे मत आहे. तिची मोठी बहीण पुण्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमाला आहे. तिथे जाण्यापूर्वी ती सुद्धा पेपर स्टॉल चालवायची. लहान भाऊ अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. सकाळी तो सुद्धा स्टॉलवर मदत करतो. ती स्वत: मानसशास्त्राची विद्यार्थिनी असून, भविष्यात तिला याच विषयात पीएच.डी. करून सरकारी नोकरी करायची आहे.

नोडो नोडो हुली बत्तू...सुश्मिताच्या आयुष्यातील एक प्रसंग तिच्या कर्तृत्वाला शाबासकी देणारा अन् आठवणीत राहील असाच आहे. पहाटे लाईनवर अंक वाटताना अनेक जण झोपेतच असतात. मात्र एक मुलगी अंक वाटते, हे ज्यांना ठाऊक होते त्यांना तिचे भारीच कौतुक! एकदा अशाच सकाळी तिला बघून एक आई आपल्या झोपलेल्या मुलाला म्हणाली, ‘नोडो, नोडो हुली बत्तू... नीनू इना मलकोंडिदी..’ अर्थात, बघ बघ वाघ आलाय.., अन् तू अजूनही झोपूनच आहेस! 

टॅग्स :SolapurसोलापूरWomenमहिलाWomen's Day Specialजागतिक महिला दिन