शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Women's Day Special; कारीतील ‘बडबडी सिस्टर’ची ४० वर्षांची अखंड आरोग्य सेवा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 11:40 IST

बालाजी विधाते  कारी: विश्व हे अनेक क्षेत्रांचे मैदान आहे. या मैदानात अनेक व्यक्ती आपल्या कर्माच्या परिश्रमावर आपला ठसा समाजात ...

ठळक मुद्दे४० वर्षे आपले जीवन आरोग्यसेवा करण्यात समर्पित करून स्वत:ला व आपला परिवार घडवलास्वर्गवासी पती यांनी देखील कारी पोस्ट आॅफिसमध्ये २० वर्षे ग्रामीण डाकिया म्हणून कर्तव्यदक्ष सेवा बजावली

बालाजी विधाते 

कारी: विश्व हे अनेक क्षेत्रांचे मैदान आहे. या मैदानात अनेक व्यक्ती आपल्या कर्माच्या परिश्रमावर आपला ठसा समाजात उमटवत असतात. कारी (ता. बार्शी) येथील सेद्दुनिसा उर्फ बडबडी खुदबुद्दीन सय्यद (वय ८५) या अर्धवेळ असलेल्या परिचारिकेने कारी गावात ४० वर्षे आपले जीवन आरोग्यसेवा करण्यात समर्पित करून स्वत:ला व आपला परिवार घडवला.

स्वर्गवासी पती यांनी देखील कारी पोस्ट आॅफिसमध्ये २० वर्षे ग्रामीण डाकिया म्हणून कर्तव्यदक्ष सेवा बजावली. दोघांच्या तुटपुंज्या मानधनावरच आपल्या कुटुंबाची अर्थव्यवस्था सांभाळून अपत्याला आकार दिला. लसीकरण असो वा आरोग्य शिबीर पूर्ण गावभर प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना भाऊ व वहिनींना हा संदेश देणे, त्यांच्या या कार्यामुळे त्यांना ‘बडबडी सिस्टर’ म्हणून पूर्ण गावभर लौकिक प्राप्त झाला आहे. रुग्णसेवेसोबतच कौटुंबिक जबाबदारीचे पालन करून तीन मुलींचे विवाह केले.

चार मुले शासकीय सेवेत कार्यरत आहेत. मोठा मुलगा गफूर हा मुंबईत पोस्टमन पदावरून सेवानिवृत्त झाला. दुसरा अब्दुल रफिक  तोगराळीमध्ये सहशिक्षक तर तिसरा रशीद डी.एड. होऊन (मुगळी, ता. अक्कलकोट) येथे शिक्षक व चौथा रसूल मुंबई येथे पोस्टमनची नोकरी करत आहे. जीवनभर प्रामाणिक सेवा केली. आता नातीला घडवण्यासाठी स्वत:चा पूर्ण वेळ आज देखील शिक्षणासाठी देतात.

ना कौतुकाची व ना पुरस्कारराची अपेक्षा ठोून काम केले. प्रामाणिक व पारदर्शक सेवा केल्यामुळे माझे कुटुंब घडले आहे, परंतु अशा अर्धवेळ परिचारिकांना वृद्धापकाळासाठी पेन्शनची गरज आहे, असे सेद्दुन्निसा उर्फ बडबडी सय्यद यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरWomen's Day Specialजागतिक महिला दिनMedicalवैद्यकीयHealthआरोग्य