शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

Shivaji Jayanti 2020; सोलापुरातील महिला घेताहेत शिवकालीन मर्दानी खेळाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 10:17 AM

संभाजी आरमारचा उपक्रम : विराट रॅलीसह महिलांची पालखी पदयात्रा, दोन गटात छायाचित्र स्पर्धेचेही आयोजन

ठळक मुद्देसंभाजी आरमारच्या वतीने यंदा शिवजयंतीनिमित्त हटके उपक्रमांचे आयोजन मर्दानी खेळाचे धडे देण्यासाठी ५ फेब्रुवारीपासून महिलांना खास प्रशिक्षणकॅमेरा अन् मोबाईल कॅमेरा या दोन गटात फोटोग्राफी स्पर्धा

सोलापूर : महिलांवरील वाढते हल्ले अन् अत्याचार महिलाच रोखतील, हा उद्देश ठेवून यंदा संभाजी आरमारच्या महिला आघाडीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून १७ फेब्रुवारीपासून दररोज सायंंकाळी ५ ते ७ पर्यंत जुळे सोलापुरातील कृष्णा कॉलनीतील मारुती मंदिराच्या पटांगणात महिलांना शिवकालीन मर्दानी खेळाचे धडे देण्यात येणार असल्याचे आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे यांनी सांगितले. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता शिवछत्रपती रंगभवन येथून विराट रॅलीसह महिलांची पालखी पदयात्राही निघणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

आज महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे महिला सक्षमीकरणाची भाषा होत असताना दुसरीकडे त्यांच्यावर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या घटना महिलांनाच रोखता आल्या पाहिजेत़ यासाठी शिवछत्रपतींचे शौर्य, पराक्रमाचे संस्कार त्यांच्यात बिंबवण्यासाठी आरमारच्या महिला आघाडीने शिवकालीन मर्दानी खेळाचे धडे देण्याचा अनोखा उपक्रम यंदा हाती घेतला आहे. 

मर्दानी खेळाचे धडे देण्यासाठी ५ फेब्रुवारीपासून महिलांना खास प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे शहरप्रमुख उमा रजपूत, उपप्रमुख ज्ञानेश्वरी गायकवाड आणि शहर सचिव कविता मराळ यांनी सांगितले. 

शिवजयंती कालावधीत (१ ते १९ फेब्रुवारी) जयंती उत्सवाबाबतच्या अनेक घटना, प्रसंगांचे छायाचित्रण करणाºयांसाठी कॅमेरा अन् मोबाईल कॅमेरा या दोन गटात फोटोग्राफी स्पर्धा आयोजित केली आहे. दोन्ही गटातून प्रत्येकी तीन बक्षिसे देण्यात येणार आहेत़ काढलेले फोटो  ई-मेल आयडीवर पाठवून द्यावेत, असे आवाहन जिल्हाप्रमुख गजानन जमदाडे, शहरप्रमुख शशिकांत शिंदे यांनी केले आहे. 

आरमारच्या शिवरॅली प्रमुखपदी छत्रबंद- संभाजी आरमारच्या वतीने यंदा शिवजयंतीनिमित्त हटके उपक्रमांचे आयोजन केले आहे. शिवाय विराट रॅलीसह पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, या शिवरॅलीच्या अध्यक्षपदी अनिल छत्रबंद यांची निवड करण्यात आल्याचे श्रीकांत डांगे यांनी बैठकीत जाहीर केले. यावेळी शिवाजी वाघमोडे, प्रा. सर्जेराव पाटील, अ‍ॅड. महेश जगताप, अ‍ॅड. बाबासाहेब जाधव, तुकाराम जाधव, प्रकाश डांगे, गजानन जमदाडे, शशिकांत शिंदे, अनंतराव नीळ, संजय सरवदे, उमा रजपूत, ज्ञानेश्वरी गायकवाड, कविता मराळ, वर्षा तोरवी, अमर गुंड, सोमनाथ मस्के आदी उपस्थित होते. पालखी सोहळ्यात संभाजी आरमारचे तीन हजार मावळे टी-शर्ट परिधान करुन सहभागी होणार आहेत. 

शिवछत्रपतींचे विचार अन् त्यांचे संस्कार युवा पिढीने घ्यावेत, यासाठी यंदाच्या शिवजयंतीनिमित्त अनोखे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत़ स्त्री रक्षणाचा विचार करुन यंदा महिलांना शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सोशल मीडियाच्या दुनियेत भरकटलेल्या युवक-युवतींना योग्य दिशा दाखविण्याचे काम संभाजी आरमारच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे शिवछत्रपतींना हेच खरे अभिवादन असणार आहे.-श्रीकांत डांगे,संस्थापक- संभाजी आरमार. 

टॅग्स :SolapurसोलापूरShivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८